Bhokar Assembly Constituency : आजोबा, वडील अन् आईने मतदारसंघाचा विकास केला, आता ती जबाबदारी माझ्यावर!

Srijaya Chavan says, the responsibility of Bhokar's development is mine now : महिलांच्या सक्षमीकरणावर आपला भर राहिल, असा विश्वासही श्रीजया चव्हाण नागरिकांना देत आहेत. महायुतीच्या जागा वाटपात भोकर विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला सुटला आहे.
Bhokardan Assembly Constituency
Bhokardan Assembly Constituency Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : भोकर विधानसभा मतदारसंघ एक विकासाचे मॉडेल म्हणून ओळखले जावे यासाठी प्रयत्न करणार आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व डॉ. शंकरराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, अमिता चव्हाण यांनी केले असून या भागाचा खूप मोठा विकास केला आहे. आता ही जबाबदारी पक्षाने माझ्यावर टाकली आहे.

या मतदारसंघांतील तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोजगाराभिमुख व्यवसायाची निर्मिती करण्यावर आपला भर असेल, अशी विधानसभेच्या भोकर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार श्रीजया चव्हाण यांनी दिले. प्रचारा निमित्त गावोगावी मतदारांच्या भेटी घेऊन आजोबा शंकरराव चव्हाण, वडील अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि आई अमिता चव्हाण यांच्या काळात भोकर मतदारसंघात विकास झाल्याचा दावा करतांना यापुढेही निरंतर विकास कामे सुरुच राहतील.

महिलांच्या सक्षमीकरणावर आपला भर राहिल, असा विश्वासही श्रीजया चव्हाण नागरिकांना देत आहेत. महायुतीच्या जागा वाटपात भोकर विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला सुटला आहे. तर नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी डॉ. संतुकराव हंबर्डे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ बैठक, चौक सभा घेऊन मतदारांशी संवाद साधला जात आहे.

Bhokardan Assembly Constituency
Bhokar Assembly Constituency : श्रीजया यांना शंकरराव चव्हाण यांचा राजकीय वारसा, भोकरच्या विकासाला गती मिळेल!

राज्यातील महायुतीच्या शासनाने महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग, विद्यार्थी यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करून सर्व सामान्य माणसाला आधार दिला आहे. मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. (Nanded) महायुतीच्या सरकारने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांमुळे सर्वसामान्य नागरिकांना फायदा मिळाला आहे.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जास्तीत मतदान करुन महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन श्रीजया चव्हाण यांनी केले. यावेळी माजी जि.प.सदस्य रोहिदास जाधव म्हणाले, भाजपा सरकारच्या काळात पोहरादेवीच्या मंगारा भवनासाठी 120 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. तीर्थक्षेत्र पोहरादेवीच्या संपूर्ण विकासासाठी 720 कोटी मंजूर करण्यात आला.वाडी तांड्यांच्या विकासासाठी भोकर विधानसभा मतदारसंघात खूप मोठा निधी उपलब्ध झाला आहे.

Bhokardan Assembly Constituency
Ashok Chavan: लाॅटरी एकदाच लागते, पुन्हा पुन्हा नाही! अशोक चव्हाण यांचा महाविकास आघाडीला टोला

भोकर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार श्रीजया चव्हाण व नांदेड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ संतुकराव हंबर्डे यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. भोकर विधानसभा मतदारसंघातील भोकर तालुक्यातील पिंपळढव सर्कलमधील तांडे- पोमनाळ तांडा, जामदरी तांडा, सोनारी तांडा, सावरगाव मेट तांडा, कांडली तांडा आदि ठिकाणी कॉर्नर बैठका घेण्यात आल्या. यावेळी माजी जि.प.सदस्य रोहिदास जाधव, जयश्रीताई राठोड, सुनिता राठोड, अनिता जाधव, सुमन पवार, डॉ. आशुतोष राजुरकर, दिलीप चव्हाण, गणेश राठोड, साईनाथ राठोड, उल्हास जाधव, दशरथ राठोड, विठ्ठल जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com