गाडी खड्ड्यात गेली आणि रायफलची गोळी छातीत घुसली : SRPF जवानाचा मृत्यू

ही घटना कशी घडली याबाबत पोलीस (Hingoli Police) सखोल चौकशी करत आहेत.
SRPF Jawan Bhanudas Pappala
SRPF Jawan Bhanudas PappalaSarkarnama
Published on
Updated on

हिंगोली : हिंगोलीच्या (Hingoli) कळमनुरी तालुक्यातील येलकी गावानजीक असलेल्या, सशस्त्र सीमा बलाच्या (SRPF) प्रशिक्षण केंद्रातील जवानाचा छातीत गोळी लागून मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या घटनेमध्ये मयत झालेल्या जवानाचे भानुदास पप्पाला असे नाव आहे. आज (ता. 22 नोव्हेंबर) सकाळी, प्रशिक्षण केंद्रातील डॉक्टरांना नांदेड रेल्वे स्थानकावरून घेऊन येण्यासाठी ते चारचाकी गाडी मधून जात होते. यावेळी डोंगरकडा ते अर्धापूर रस्त्यावर अचानक त्यांची गाडी खड्ड्यामध्ये आदळल्याने जवान भानुदास यांच्या हातातील रायफल मधून गोळी निसटली आणि ती थेट त्यांच्या छातीत घुसल्याने ते जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जखमी जवानास पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार करण्याआधीच डॉक्टरांनी या जवानास मृत घोषित केले आहे. याघटनेची बाळापूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

SRPF Jawan Bhanudas Pappala
विधानपरिषदेसाठी प्रज्ञा सातव बिनविरोध; संजय केणेकरांची माघार

मिळालेल्या माहितीनुसार जवान भानुदास हे काही महिन्यांपासून येथे कार्यरत होते. सकाळी सव्वा तीन वाजताच्या सुमारास सहकारी चालक कानाराम यांच्यासोबत सशस्त्र सीमा बलातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका यांना आणण्याकरीता जात होते. दरम्यान डोंगरकडा शिवारात त्यांचे वाहन एका मोठ्या खड्ड्यात गेल्याने जवान भानुदास यांच्या हातातील रायफलमधून अपघाताने गोळी सुटली आणि सरळ त्यांच्या छातीत घुसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर तत्काळ त्यांना अर्धापूर (जि.नांदेड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. यानंतर तेथून त्यांना नांदेड विष्णुपुरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या घटनेची सखोल चौकशी पोलीस करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com