ST Caste Verification : जात पडताळणी समितीला टाळे ठोकणार, महादेव कोळी समाज आक्रमक

Mahadev Koli Community Threatens Lockdown Protest : समितीकडून प्रत्येक अर्ज फेटाळला जात असल्याने अर्जदारांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागत आहे.
Mahadev Koli Community Threatens Lockdown Protest
Mahadev Koli Community Threatens Lockdown Protest sarkarnama
Published on
Updated on

राम काळगे

Caste Verification Case : मराठवाड्यातील अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट असलेल्या महादेव कोळी आणि मल्हार कोळी जमातीच्या बांधवांवर जात पडताळणी समितीकडून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात समाज आक्रमक झाला आहे. या अन्यायाचा निषेध नोंदवण्यासाठी येत्या सोमवारी, १० ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या कार्यालयाला प्रतिकात्मक टाळे ठोक आंदोलन करण्यात येणार आहे.

एकीकडे मराठा समाजातील कुणबी जात प्रमाणपत्रांच्या पडताळणीवरून राज्यभर वातावरण तापलेले असताना, दुसरीकडे मराठवाड्यातील आदिवासी कोळी समाजाची गंभीर समस्या समोर आली आहे. २०११ सालापासून जात पडताळणी समितीकडून या जमातीच्या एकाही प्रकरणाला वैधता प्रमाणपत्र दिले जात नसल्याचा आरोप समाजाने केला आहे.

दिलेली वैधता रद्द करण्याचे सत्र

समितीकडून प्रत्येक अर्ज फेटाळला जात असल्याने अर्जदारांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागत आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरच वैधता प्रमाणपत्र मिळत आहे.

ज्या कुटुंबांना आधीच जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यांना संभाजीनगर येथील समितीकडून पुन्हा चौकशीच्या नोटिसा पाठवून सुनावणीदरम्यान त्यांची वैधता रद्द केली जात आहे.

टी.आर.टी.आय. अंतर्गत नाशिक, पुणे आणि ठाणे येथील समित्या १९५० पूर्वीच्या 'कोळी' नोंदी ग्राह्य धरून वैधता प्रमाणपत्र देत आहेत. मात्र, मराठवाड्यातील चारही समित्यांकडून याच नोंदी 'विरुद्ध नोंदी' (Contra Entry) ठरवून अर्ज फेटाळले जात आहेत.

Mahadev Koli Community Threatens Lockdown Protest
Kunabi Certificate: मराठवाड्यात तिसरे मराठा-कुणबी प्रमाणपत्र बोगस: बीड, परभणी अन् संभाजीनगरमधील तीन लोकप्रतिनिधींना अपात्रतेचा दणका

कायद्याकडे दुर्लक्ष

बालाघाट व अजिंठा डोंगररांगांमध्ये महादेव व मल्हार कोळी जमात प्राचीन काळापासून वास्तव्यास असल्याचे ब्रिटिश व निजामकालीन गॅझेटियर आणि संशोधन ग्रंथांत स्पष्ट नमूद आहे. तसेच संसदेने १९७६ च्या कायद्यानुसार क्षेत्रबंधन रद्द केले असूनही समिती याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे.

मराठवाड्यातून तीव्र प्रतिसाद

या अन्यायाविरोधात यापूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ८ समाजबांधवांनी १२ दिवस अन्नत्याग उपोषण केले होते. तसेच महिन्याभरापूर्वी याबाबतचे निवेदनही देण्यात आले होते.

येत्या १० ऑगस्ट रोजी होणाऱ्या टाळेठोक आंदोलनासाठी परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि जालना या सर्व जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समाजबांधव संभाजीनगर येथे एकत्र येणार आहेत.

Mahadev Koli Community Threatens Lockdown Protest
Kunabi Caste Validity: प्रमाणपत्र देताना मराठा कुणबी जाणवला, मग व्हॅलिडीटी का नाही? राज्य सरकारकडं खुलाशाची मागणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com