High Court News : मंत्री जयकुमार गोरेंच्या आदेशाला स्थगिती; वालूरच्या सरपंचांना दिलासा!

The High Court bench has issued a stay order on Minister Jaykumar Gore’s directive, providing relief to the sarpanch of Valur village. : निकाल विरोधात गेल्याने सरपंच साडेगावकर यांनी ॲड. श्रीकांत कवडे यांच्यामार्फत खंडपीठात धाव घेतली. या प्रकरणात विभागीय आयुक्तांनी शहानिशा करून याचिका फेटाळली होती.
Bombay High Court bench Aurangabad News
Bombay High Court bench Aurangabad NewsSarkarnama
Published on
Updated on

Parbhnai News : वालूर (ता. सेलू, जि. परभणी) येथील सरपंच अपात्रतेच्या संदर्भात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संतोष चपळगावकर यांनी दिले.

वालूर येथील सरपंच संजय साडेगावकर यांच्याविरोधात काही जणांनी परभणी (Parbhani) गटविकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. १४व्या वित्त आयोगाच्या निधीचा गैरवापर केला. साडेतीन लाख रुपयांचा ग्रामपंचायतीचा कर बॅंक खात्यात न भरता त्याचा अपहार केला. गावातील बाजार मक्ता कमी भावात देण्यात आला. वर्ष २०१५ ते २०२५ पर्यंतचे ऑडिट केले नाही.

त्यामुळे सरपंच साडेगावकर यांना अपात्र करण्याची मागणी करण्यात आली होती. (High Court) या प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबद्दलचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठवला. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी सुनावणी घेतली. परंतु, प्रकरण राखून ठेवत पुन्हा प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

Bombay High Court bench Aurangabad News
High Court News : नवीन प्रभाग रचनेला खंडपीठात आव्हान! नगर विकासचे प्रधान सचिव, संचालकांना नोटीस

त्यानंतर मात्र विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या सुनावणीनंतर तक्रार फेटाळून लावली. म्हणून विरोधकांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर अपिल दाखल करत विभागीय आयुक्तांच्या आदेशाला अव्हान दिले. मंत्री गोरे यांनीही सुनावणी घेत अपिलार्थींच्या मुद्द्याशी सहमत असल्याचे स्पष्ट करून अपिल मंजूर केले.

Bombay High Court bench Aurangabad News
Jaykumar Gore : जयकुमार गोरे खंडणी प्रकरणी मोठी घडामोड; थेट दिल्लीतून मांत्रिकाला अटक

निकाल विरोधात गेल्याने सरपंच साडेगावकर यांनी ॲड. श्रीकांत कवडे यांच्यामार्फत खंडपीठात धाव घेतली. या प्रकरणात विभागीय आयुक्तांनी शहानिशा करून याचिका फेटाळली होती. मात्र, सहकारमंत्र्यांनी कारणमीमांसा न करता दिलेला निर्णय कायद्याच्या चौकटीत नाही, त्यामुळे स्थगिती देण्याची विनंती केली. सुनावणीनंतर खंडपीठाने मंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशाला स्थगिती दिली. पुढील सुनावणी तीन आठवड्यांनी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com