Tanaji Sawant : औकातीत राहा, राजकीय तिढा सुटला की जशास तसे उत्तर देऊ..

उस्मानाबाद येथील त्यांच्या संपर्क कार्यालयावर खेकडा आमदार गद्दार म्हणत आज निदर्शने करण्यात आली. (Osmanabad)
Mla Tanaji Sawant, Bhum-Paranda
Mla Tanaji Sawant, Bhum-ParandaSarkarnama

उस्मानाबाद : एकनाश शिंदे यांच्या बंडात सहभागी असलेल्या आमदारांच्या विरोधात शिवसैनिकांचा रोष वाढत चालला आहे. (Osmanabad) राज्यात ठिकठिकाणी बंडखोरांच्या विरोधात निदर्शने, त्यांच्या कार्यालायवर हल्ले केले जात आहेत. भूम-परंड्याचे आमदार प्रा. तानाजी सावंत यांच्या पुणे व उस्मानाबादेतील कार्यालयावर देखील हल्ला आणि निदर्शने करण्यात आली. (Shivsena) याची माहिती मिळताच सावंत चांगलेच संतापले आहेत. फेसबुक पोस्ट करत सांवत यांनी `औकातीत राहा, हा राजकीय तिढा सुटल्यानंतर जशास तसे उत्तर देऊ`, असा गर्भीत इशारा दिला आहे.

राज्यातील महाविकास आघाडीला हादरा देत एकनाथ शिंदे व त्यांच्यासह शिवसेना व अपक्ष असे मिळून ५० पेक्षा जास्त आमदारांनी बंड पुकारले आहे. हे सगळे मंत्री आमदार सध्या आसामच्या गुवाहाटी शहरात मुक्कामी आहेत. (Tanaji Sawant) महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न तिथून सुरू आहेत. तर दुसरीकडे हे सरकार टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेचे इतर नेते कायदेशीर बाजू तपासत शिंदे गटाला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करत आहेत.

या बंडखोरांविरुध्द आता शिवसैनिक देखील आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले आहेत. पुण्यात आमदार प्रा. तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला करून तोडफोड केली. याची माहिती मिळाल्यानंतर सांवत यांच्या मुलाकडून आम्ही अशा छाटछूट हल्याला घाबरत नसल्याचे म्हटले होते. तिकडे भूम-परांडा या मतदारसंघात देखील सावंत यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

Mla Tanaji Sawant, Bhum-Paranda
Nanded : शिवसेनेचे दहा खासदारही बंडाच्या तयारीत ; चिखलीकरांचा दावा..

उस्मानाबाद येथील त्यांच्या संपर्क कार्यालयावर खेकडा आमदार गद्दार म्हणत आज निदर्शने करण्यात आली. त्यानंतर खवळलेल्या सावंत यांनी फेसबुक पोस्ट करत आपल्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना चागंलाच दम भरला आहे. ` औकातीत राहा, राज्यातील राजकीय प्रश्न सुटला की जशास तसे उत्तर देऊ`, असे सावंत यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com