नांदेडमध्ये दोन गटात जोरदार दगडफेक ; तीन जण जखमी

दगडफेकीमुळे या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता, या दगडफेकीमध्ये परिसरातील दुकानांचे, दुचाकींचे नुकसान झाले आहे.
नांदेडमध्ये दोन गटात जोरदार दगडफेक ; तीन जण जखमी

नांदेड : नांदेड (Nanded) येथे मंगळवारी रात्री उशिरा दगडफेकीची घटना घडली. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता. आता परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. शहरातील गडीपुरा, धोबी गल्ली परिसरात ही धक्कादायक घटना घडली. अज्ञान व्यक्तींनी ही दगडफेक केल्याचे पोलिसांनी सांगितलं. या दगडफेकीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मंगळवारी मध्यरात्री झालेल्या या दगडफेकीमुळे या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता, या दगडफेकीमध्ये परिसरातील दुकानांचे, दुचाकींचे नुकसान झाले आहे. रस्त्यावर दगडांचा खच पडला होता. अज्ञान व्यक्तींनी सुमारे अर्धातास ही दगडफेक केली, या घटनेत तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नांदेडमध्ये दोन गटात जोरदार दगडफेक ; तीन जण जखमी
नार्वेकरांचं टि्वट ठाकरे सरकारच्या पायाला सुरुंग लावण्यासारखे ; चंद्रकांतदादांचा टोला

दोन गटात झालेल्या या दगडफेकीमध्ये महावितरणच्या (MSEDCL)डीपीचे नुकसान झाले आहेत. काही काळ येथील वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. दगडफेक करणारे अंधाराच फायदा घेऊन फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

तानाजी सावंत अन् ओमराजे निंबाळकरांमध्ये खडाजंगी!

उस्मानाबाद : निधीच्या वाटपावरुन पालकमंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh), खासदार ओमराजे निंबाकर (Omraje Nimbalkar)आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यात वाद निर्माण झाल्यानं राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महावितरण कामाचे बील आणि समान निधी वाटपाच्या विषयावरुन ही खडाजंगी झाली.

पालकमंत्री गडाख यांनी, 'प्रत्येक गोष्ट कारवाई किंवा बिले अडवून करता येणार नाही, यापुढे चुका होणार नाहीत याची काळजी घ्या,' असे सांगत हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. तर आमदार कैलास पाटील यांनी यावर बोलणं टाळले. महावितरण आणि इतर सूचनांची अंमलबजावणी झाली नाही तर पालकमंत्री यांची तक्रार थेट मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचा इशारा सावंत यांनी पालकमंत्री गडाख यांना दिल्याचे सुत्रांनी सांगितले. भ्रष्टाचाराचे आरोप करून याबाबत कोर्टात जाण्याची तंबी आमदार सावंत यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com