Sudhakar Shrangare: निवडणुकीत पाडून काँग्रेस प्रवेशाची संधी दिल्याबद्दल आभार! शृंगारेंच्या टोलेबाजीने धमाल

Sudhakar Shrangare joined the Congress: भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मला प्रचार करू दिला नाही आणि स्वतः आजारपण, बैठकांची कारणे देत घरात बसून राहिले. एक आमदार तर मी माझ्या मतदारसंघातून मायनस आहे, असे सांगून लातूरमध्ये माझ्या प्रचाराला फिरकलाच नाही
Latur BJP-Congress News
Latur BJP-Congress NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेच्या लातूर मतदार संघातील भाजपचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी काल अचानक काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अमित देशमुख-धीरज देशमुख यांच्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या मेळाव्यात शृंगारे यांनी थेट महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर एन्ट्री केली. यावेळी केलेल्या पंधरा मिनिटांच्या भाषणात सुधाकर शृंगारे यांनी जिल्ह्यातील भाजप नेत्यांची चांगलीच धुलाई केली.

लोकसभेला मला पराभूत करून काँग्रेसमध्ये येण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचेही आभार, असे म्हणत शृंगारे यांनी व्यासपीठावर बसलेल्या काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि उपस्थिती कार्यकर्त्यांनाही टोला लगावला. सुधाकर शृंगारे यांच्या या भाषणाची चर्चा सध्या जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे.

2014 आणि त्यानंतर 2019 अशा सलग दोन्ही निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळण्याआधी आपल्याला अमित देशमुख यांनी काँग्रेस कडून उमेदवारीची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट शृंगारे यांनी भाषणात केला.

भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मला प्रचार करू दिला नाही आणि स्वतः आजारपण, बैठकांची कारणे देत घरात बसून राहिले. एक आमदार तर मी माझ्या मतदारसंघातून मायनस आहे, असे सांगून लातूरमध्ये माझ्या प्रचाराला फिरकलाच नाही, असा टोला शृंगारे यांनी आमदार अभिमन्यू पवार, संभाजी पाटील निलंगेकर, रमेश कराड यांना लगावला.

दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत मी उमेदवारी मागितली नव्हती. दिल्लीतून मोदी साहेबांनी तिकीट दिले ? का शहासाहेबांनी हे मला माहीत नाही. पण एकदा तिकीट फायनल झाल्यावर जिल्ह्यातल्या नेत्यांची माझा प्रचार करण्याची, मला निवडून आणण्याची जबाबदारी होती का नाही ? असा सवाल शृंगारे यांनी केला.

Latur BJP-Congress News
Latur Assembly Constituency: ना गाजावाजा ना चर्चा, भाजपच्या सुधाकर शृंगारे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

अमित देशमुख यांनी मला काँग्रेस कडून उमेदवारीची दोन वेळा ऑफर दिली. पण मी ती स्वीकारू शकलो नाही, त्याबद्दल त्यांची क्षमा मागतो. पण आता या जिल्ह्यामध्ये भाजपच्या सगळ्या आमदारांना पाडायचं आणि जिल्ह्यात काँग्रेस- महाविकास आघाडीचे सहा आमदार निवडून आणायचे, असे आवाहन शृंगारे यांनी केले. समोर उपस्थित काँग्रेस कार्यकर्ते आणि व्यासपीठावरील नेत्यांकडे कटाक्ष टाकत मला काँग्रेसमध्ये प्रवेश दिला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.

निवडणुकीत मला पाडून या पक्षात येण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहे, असा चिमटाही काढला.काँग्रेस मधील माझा हा प्रवेश म्हणजे भविष्यात काही तरी चांगले घडण्याची चाहूल आहे. काँग्रेस पक्षात झालेला माझा हा प्रवेश म्हणजे माझा पुनर्जन्म आहे. मला काही आता निवडणूक लढवायची नाही, अमित देशमुख- धीरज देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीच्या आमदारांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी काम करायचे आहे.

Latur BJP-Congress News
Congress : डॉ हेमलता पाटील यांची बंडखोरी, म्हणाल्या "काँग्रेस मला उमेदवारी देईल"

मला फक्त पक्षात सन्मान द्या, असे म्हणत दिलीपराव देशमुख, अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात काम करणार असल्याचे सांगितले. भाजपमध्ये पाच वर्ष माझा मानसिक छळ झाला. दिल्लीतल्या किंवा राज्यातल्या नेत्यांवर माझा रोष नाही. पण जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनी मला काम करू दिले नाही, असा आरोप भाषणाच्या शेवटी शृंगारे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com