Beed: सुनेत्रा पवार 'ॲक्शन मोड'मध्ये; बारामतीनंतर आता घेतली बीड जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती!

Sunetra Pawar Beed Visit, Beed Development, Beed Guardian Minister: सुनेत्रा पवार यांनी बीड दौऱ्यात जिल्हा रुग्णालयाची पाहणी, कार्डियाक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण, कंकालेश्वर मंदिर विकासकामांचा आढावा घेत प्रशासनाला विकास आणि आरोग्य सेवांबाबत कठोर सूचना दिल्या.
Guardian Minister Sunetra Pawar inspects Beed District Hospital, inaugurates a cardiac ambulance and reviews ongoing development projects during her district visit.
Guardian Minister Sunetra Pawar inspects Beed District Hospital, inaugurates a cardiac ambulance and reviews ongoing development projects during her district visit.Sarkarnama
Published on
Updated on

Sunetra Pawar Beed Visit: पालकमंत्री सुनेत्रा पवार या बीड जिल्ह्याला वेळ देत नाही, अशी टीका करणाऱ्यांना त्यांनी आपल्या कामाच्या धडाक्यातून सडेतोड उत्तर दिले आहे. आपल्या बीड जिल्ह्याच्या दुसऱ्याच दौऱ्यात सुनेत्रा पवार यांनी ॲक्शन मोडवर येत सकाळी सात वाजताच बीड जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. या पुर्वी देखील एकदा बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी अजितदादा स्टाईलमध्ये बारामती उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयातील अस्वच्छता आणि कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा पाहून संताप व्यक्त केला व दोषी अधिकाऱ्यांवर तडकाफडकी कारवाईचे आदेश दिले होते.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच पावलावर पाऊल ठेवत सुनेत्रा पवार यांनी सकाळपासूनच कामाला सुरुवात केली. त्यांच्या कामाचा उरक आणि प्रशासनाला दिलेल्या सूचना पाहता बीडकरांना पुन्हा एकदा अजितदादांची आठवण झाली. सुनेत्रा पवार यांनी रात्री अकरा वाजेपर्यंत बैठका घेत बीडच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाला सक्त सूचना दिल्या.

विकासकामांचे नकाशे, प्रशासकीय फायली आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर आज पुन्हा सकाळी सात वाजताच सुनेत्रा पवार थेट बीड जिल्हा रुग्णालयाच्या पाहणीसाठी पोहोचल्या. दिवंगत नेते अजित पवार यांनी बीडचे पालकत्व स्वीकारल्यानंतर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी निधीचा पाऊस पाडला होता. प्रशासनाला २४ तास कामाला लावून विकासाची चक्रे सुसाट पळवली होती.

Guardian Minister Sunetra Pawar inspects Beed District Hospital, inaugurates a cardiac ambulance and reviews ongoing development projects during her district visit.
Maharashtra Politics Live Update : 'देवाच्या इच्छेने, मी मंत्रिमंडळातून बाहेर' : माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार

परंतु, त्यांच्या अकाली जाण्याने आता बीडचे काय होणार? सुरू झालेली कामे थांबणार का? अशा अनेक चिंतेच्या ढगांनी बीडकरांच्या मनाला घेरले होते. मात्र, सुनेत्रा पवारांच्या दोन दिवसांच्या झंझावाती दौऱ्याने बीडकरांच्या मनात निर्माण झालेली ही भीती एका नव्या विश्वासात परिवर्तित झाली आहे. गुरुवारी दिवसभर सलग बैठकांचा सपाटा चालवल्यानंतर रात्री उशिरापर्यंत सामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून घेणाऱ्या सुनेत्रा पवारांनी शुक्रवारी सकाळी सात वाजताच जिल्हा रुग्णालय गाठले.

पालकमंत्री महोदया स्वतः भल्या पहाटे रुग्णालयात हजर झाल्याचे पाहून प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. रुग्णालयातील आरोग्य सेवांची प्रत्यक्ष पाहणी करत, रुग्णांची विचारपूस करत आणि सुरू असलेल्या विकासकामांचा बारकाईने आढावा घेत त्यांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दात सूचना दिल्या. आरोग्य सेवेत कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, कामात तत्परता आणि पारदर्शकता हवीच, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी प्रशासनाला आपल्या कामाची दिशा दाखवून दिली.

Guardian Minister Sunetra Pawar inspects Beed District Hospital, inaugurates a cardiac ambulance and reviews ongoing development projects during her district visit.
Maharashtra Politics Live Update : विरोधी पक्षांना अस्थिर करण्यासाठीच काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चा - शशिकांत शिंदे

अजितदादा गेल्यानंतर बीड पोरके झाले होते, पण सुनेत्रा वहिनींनी ज्या आस्थेने अन् धडाक्याने सूत्रे हाती घेतली आहेत, त्यावरून दादांचा विकासाचा वारसा आता अधिक वेगाने पुढे जाईल,अशीच प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून व्यक्त होताना दिसत आहे.

अजितदादांच्या आठवणी अन् अपेक्षांना नवी पालवी..

​अजितदादांच्या पाऊलवाटेवर चालत सुनेत्रा पवार यांनी ज्या तळमळीने आणि झपाट्याने सूत्रे हाती घेतली आहेत, त्यामुळे बीडच्या विकासाचा धागा तुटू दिला जाणार नाही ही भावना आता बीडकरांच्या मनात पक्की झाली आहे. त्या केवळ कागदावरच्या पालकमंत्री राहिलेल्या नसून, प्रत्यक्षात कृतीशील आणि परिणामकारक नेतृत्व म्हणून मैदानात उतरल्या आहेत. ​या धडक आणि हटके कार्यपद्धतीमुळे बीडकरांच्या आशा-आकांक्षांना पुन्हा एकदा नवी पालवी फुटल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कार्डियाक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक कार्डियाक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण केले. त्यानंतर त्यांनी हृदयरोगावरील उपचारांसाठी महत्त्वाच्या कॅथलॅब आणि नव्याने स्थलांतरित माता व बालसंगोपन इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करून आरोग्य सुविधांचा बारकाईने आढावा घेतला. आरोग्य सेवेत कोणतीही हलगर्जी अजिबात खपवून घेतली जाणार नाही, सर्वसामान्य रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी प्रशासनाने कामात तत्परता आणि पारदर्शकता ठेवलीच पाहिजे अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी सूचना केल्या.

कंकालेश्वर मंदिराची पाहणी

सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कंकालेश्वर मंदिराची प्रत्यक्ष पाहणी केली. मंदिराचे पौराणिक महत्त्व जपून परिसराचा कायापालट करण्यासाठी मंजूर ९ कोटी रुपयांच्या विकासकामांचा त्यांनी बारकाईने आढावा घेतला. कंकालेश्वर मंदिर हे बीडची सांस्कृतिक ओळख आहे. येथे येणाऱ्या भाविकांच्या सुविधा आणि मंदिराच्या सौंदर्यीकरणासाठी मंजूर निधीतून दर्जेदार कामे व्हावीत. वेळेच्या मर्यादेत काम पूर्ण करून परिसराचा विकास साधावा, असे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com