MLA Suresh Dhas News : डोक्यावर फर कॅप अन् वाढलेली पांढरी दाढी, सुरेश धस यांच्या 'दावत ए इफ्तार' मधील लूकची चर्चा!

BJP MLA Suresh Dhas attends Iftar in a unique look with a turban and a long beard. A glimpse of his participation in the Ramadan celebration. : सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले भाजपाचे आमदार सुरेश धस हे सध्या बीड जिल्हा आणि आपल्या आष्टी मतदारसंघातील 'दावत ए इफ्तार' पार्ट्यांना आवर्जून हजेरी लावत आहेत.
MLA Suresh Dhas In Iftar News
MLA Suresh Dhas In Iftar NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून रमझान ईद निमित्त देशातील मुस्लिम बांधवांना 'सौगात-ए-मोदी'ची घोषणा केली. त्यानंतर भाजपाच्या नेत्यांमध्ये इफ्तार पार्ट्यांमधील सहभागाचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रात नागपूरची दंगल, औरंगजेब कबरीचा मुद्दा या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला तणाव आणि हिंदू-मुस्लिम यांच्यात निर्माण झालेली दरी कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.

सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले भाजपाचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) हे सध्या बीड जिल्हा आणि आपल्या आष्टी मतदारसंघातील 'दावत ए इफ्तार' पार्ट्यांना आवर्जून हजेरी लावत आहेत. डोक्यावर फर कॅप, वाढलेली पांढरी दाढी अशा डॅशिंग लूकमध्ये वावरणाऱ्या धस यांची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींच्या अटकेसाठी दररोज नवनवे पुरावे, दावे आणि आकाचा उल्लेख करत धस यांनी हे प्रकरण राज्यपातळीवर नेले.

धस यांच्या नेतृत्वाखालीच राज्यभरात संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी आक्रोश मोर्चे निघाले. धनंजय मुंडे यांचा राईट हॅन्ड असलेल्या वाल्मीक कराड याचा देशमुख हत्येशी असलेला संबंध, त्यासंदर्भातील पुरावे, कागदपत्र माध्यमांसमोर आणत धस यांनी विधिमंडळाचे नागपूर अधिवेशन दणाणून सोडले होते. (Beed News) आरोपींना अटक होऊन मकोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई, मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यातही धस यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

MLA Suresh Dhas In Iftar News
MLA Suresh Dhas News : एक दाढीने महाभारत, त्यात आता सुरेश धसांच्या वाढत्या दाढीची चर्चा!

धनंजय मुंडे यांची गुप्तपणे घेतलेली भेट, सतीश भोसले उर्फ खोक्याला झालेली अटक त्यावरून धस यांच्यावर विरोधकांनी केलेले आरोप या सगळ्या संकटातून ते तुर्तास तरी बाहेर पडल्याचे चित्र आहे. दरम्यान, गेल्या साडेतीन महिन्यापासून सुरेश धस हे नाव राज्यभरात गाजत आहे. त्यामुळे इफ्तार पार्ट्यांना त्यांची हजेरी लक्षवेधी ठरत आहे. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अशा इफ्तार पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. धस यांच्याभोवतीचा गराडा पाहता त्यांची क्रेझ कायम असल्याचे दिसून आले आहे.

MLA Suresh Dhas In Iftar News
Beed Santosh Deshmukh Murder : फरार असताना कृष्णा आंधळेचा विष्णू चाटे अन् वाल्मिक कराडला तीनवेळा फोन; उज्ज्वल निकमांनी खटल्यावरची 'पक्कड' दाखवली

या निमित्ताने सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरण आणि धनंजय मुंडे यांची महिनाभरापुर्वी घेतलेल्या गुप्तभेटीमुळे निर्माण झालेले संशयाचे वातावरण कमी करण्याचा प्रयत्नही धस यांच्याकडून केला जातोय. एक प्रकारे डॅमेज कंट्रोल करून आपल वोट बँक सांभाळण्यासाठी धस यांची ही धडपड असल्याचे बोलले जाते. सध्या बीड जिल्ह्याच्या राजकारणात मुंडे बहिण-भावापेक्षा सुरेश धस यांचीच चलती असल्याचे बोलले जाते.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com