Suresh Dhas: सुरेश धसांनी अजितदादांना दिलेल्या पेन ड्राईव्ह मध्ये दडलंय काय? 500 जण कोमात...

Beed District Planning Meeting: सामाजिक न्याय मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी 73 कोटी रुपयांची बोगस बिले जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उचलल्याचा थेट आरोप धस यांनी केला होता.

Beed District Planning Meeting
Beed District Planning MeetingSarkarnama
Published on
Updated on

Beed, 30 Jan 2025: मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विरोधकांनी केली आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी यावरुन रान उठवले आहे.

आज बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत लोकप्रतिनिधी म्हणून सुरेश धस उपस्थित होते. त्यांनी अजित पवार यांना एक पेन ड्राईव्ह दिला. यावेळी सभागृहात सन्नाटा झाला. पेन ड्राईव्ह अजितदादांनी घेतला आहे. यात काय असेल, याबाबतचे चर्चांना उधाण आले आहे.


Beed District Planning Meeting
Bhai Uddhavradada Patil: हेच खरे भाई अन् दादाही! ज्यांनी CM पदावर सोडले पाणी, मात्र पक्ष सोडला नाही!

सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर 73 कोटी रुपयांचा भष्ट्राचार केल्याचा आरोप केला आहे, याबाबत तो पेन ड्राईव्ह असावा, अशी शक्यता आहे. सामाजिक न्याय मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी 73 कोटी रुपयांची बोगस बिले जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उचलल्याचा थेट आरोप धस यांनी केला होता. हा सर्व प्रकार अजित पवारांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे धस यांनी बुधवारी सांगितले आहे. आज डीटीडीपीची बैठक सुरु होताच धस यांनी अजितदादांकडे हा पेन ड्राईव्ह दिला.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे, मंत्री पंकजा मुंडे, आमदार संदीप क्षीरसागर ,खासदार बजरंग सोनवणे यांच्यासमोरच धस यांनी पेन ड्राईव्ह दिला. या पेन ड्राईव्हमध्ये मुंडे यांनी केलेले गैरव्यवहार आणि अन्य काही माहिती असल्याचे सुरेश धस यांनी पत्रकारांना सांगितली.

2021 ते 2022 या काळात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून कुठलेही विकासकामे न करता धनंजय मुंडे यांनी 73 कोटी रूपये लाटले, असा आरोप सुरेश धस यांनी बैठकीत मांडला. त्यावर त्याची लेखी तक्रार करा,’ असं अजितदादांनी सुरेश धस यांना सांगितलं

बैठकीनंतर सुरेश धस यांनी पत्रकारांसी संवाद साधला. ते म्हणाले, "मी अजितदादांचे पीए डिसलेंना पेनड्राईव्ह दिला आहे.याची लेखी तक्रार देणार आहे. राज्याचे सचिव किंवा उपसचिव पदाचा एखादा अधिकारी चौकशी करण्यासाठी नेमला जाईल. पाच कोटी रूपये दोनदा उचलले आहेत, हे सरकारने मान्य केले आहे. एकूण 78 कोटी रूपयांचा घोटाळा झाला आहे," "मी हा घोटाळा समोर आणल्यापासून जवळपास 500 लोक कोमात गेले आहेत,” असे धस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com