Marathwada Political News : बीड येथील स्वाभिमानी सभेला रवाना होण्यापुर्वी वाटेत गेवराई येथे शरद पवारांनी माजी आमदार बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी काही क्षण त्यांच्या कुटुंबासोबत चर्चा केली आणि ते पुढे बीडकडे रवाना झाले. (Sharad Pawar Rally) शरद पवारांची बदामराव पंडित यांच्या घरी भेट ही पुर्वनियोजित होती.
त्यामुळे गेवराईमध्ये पवारांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती. ढोल-ताशे आणि फटाकाच्या आतषबाजीत शरद पवारांचे (Sharad Pawar) स्वागत झाल्यानंतर ते पंडित यांच्या निवास्थानी दाखल झाले. (Beed News) माजीमंत्री शिवाजीराव पंडित आणि शरद पवार यांची मैत्री व जिव्हाळ्याचे संबंध अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहेत.
१० आॅक्टोबर २०२२ रोजी शिवाजीराव पंडित यांच्या ८५ व्या वाढदिवसाला शरद पवारांनी गेवराईत हजेरी लावली होती. तेव्हा या दोघांमधील मैत्री आणि जुन्या आठवणींचे अनेक किस्से सांगितले गेले. (NCP) त्यानंतर आज पवार गेवराईत आले, तेही पंडित यांच्याच घरी. पण यावेळी त्यांनी मार्ग बदलला होता. बदमराव पंडित हे गेवराई मतदारसंघातून तीन वेळा विधानसभेवर निवडून गेलेले आहेत. सध्या ते उद्धव ठाकरे गटासोबत आहेत.
राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर तत्कालीन प्रदेशर सरचिटणीस, माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी अजित पवारांसोबत जाणे पसंत केले. त्यामुळे शिवाजीराव पंडित आणि शरद पवार यांच्या नात्यात दुरावा आला नसला तरी पवारांनी बदामरावांच्या घरी भेट देत सूचक संकेत दिल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता शरद पवारांनी पंडित कुटुंबियांची घेतलेली ही भेट बदामरावांना बळ देणारी ठरणार आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.