Tanaji Sawant : रस्त्यांची सगळी कामे सावंतांच्या मतदारसंघात, तरी सत्ताधारी, विरोधी आमदार गप्प..

Osmanabad : सावंत आता सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातील निधीही स्वतःकडे खेचुन घेत आहेत.
Minister Tanaji Sawant, Osmanabad
Minister Tanaji Sawant, Osmanabad Sarkarnama

Osmanabad : प्रा.तानाजी सावंत हे राजकारणात आल्यापासुन नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. आता ते पालकमंत्री म्हणुन जिल्ह्याची जबाबदारी सांभाळत आहेत, तिथेही त्यांनी आपली छाप पाडण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री सडक योजनेच्या १६४ किलोमीटर कामापैकी (Tanaji Sawant) सावंत यांच्या एकट्या मतदारसंघात १३० किलोमीटरच्या कामाचा प्रस्ताव दिला आहे.

Minister Tanaji Sawant, Osmanabad
Prakash Ambedkar : ''...तर शिंदे गटाशी युती करण्याबाबत विचार करु!''; प्रकाश आंबेडकरांचं सूचक वक्तव्य

विशेष म्हणजे निवड समितीचे अध्यक्ष स्वतःपालकमंत्रीच (Guardian Minister) असतात. जिल्ह्याचा विचार केला तर भाजपचे एक, शिंदे गटाचे दोन, ठाकरे गटाचे एक असे चार आमदार आहेत. त्यात ठाकरे गटाचे कैलास पाटील, भाजपचे राणाजगजितसिंह पाटील, शिंदे गटाचे प्रा.तानाजी सावंत व ज्ञानराज चौगुले. (Osmanabad) सावंत यांना आरोग्यमंत्री पदाची बक्षिसी देण्यात आली शिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले.

पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा त्यानी महाविकास आघाडीने मंजुर केलेल्या सर्व कामाना स्थगिती दिली. त्यानंतर स्वतःच्या मतदारसंघात एक भव्य आरोग्य शिबीर भरवले, तिथे राज्यस्तरीय डॉक्टरांची टिम पाचारण केली. निधी बाबतीत त्यांनी कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी अकरा हजार कोटीच्या कामांना कॅबिनेटची मंजुरी मिळवुन घेतली. त्यामुळे सावंत आता सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातील निधीही स्वतःकडे खेचुन घेत आहेत.

तरीही त्यांच्यापुढे बोलणे या आमदाराना शक्य नसल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची कामे सुचविण्यासाठी एक बैठक झाली. त्यामध्ये १६४ किमी कामांची यादी करण्यात आली, त्यामध्ये एकट्या सावंत यांच्या भुम-परंडा-वाशी मतदारसंघासाठी १३० किलोमीटरची कामे सुचविण्यात आली आहेत.

उर्वरीत ३४ किलोमीटर तीन मतदारसंघासाठी ठेवण्यात आली आहेत. तालुक्याच्या क्षेत्रफळानुसार खरतर ही कामे देण्याची पध्दत असते, पण प्रा.सावंत यांचे स्वतःचे नियम असतात त्यावेळी ते सत्ताधारी दोन आमदार काय म्हणतील याचाही विचार करत नाहीत. जिल्ह्यावर भाजपचे राणाजगजितसिंह पाटील यांचा प्रभाव आहे, तर ज्ञानराज चौगुले हे तीनवेळा निवडुन आले आहेत.

Minister Tanaji Sawant, Osmanabad
Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदे- आंबेडकरांमध्ये बंद दाराआड खलबतं; वंचित कुणासोबत ठाकरे की शिंदे?

पण पहिल्यांदाच जनतेतुन निवडुन आलेले सावंत मात्र जिल्ह्याचा हुकुमी एक्का ठरताना दिसत आहेत. यात विरोधी गटाचे आमदार कैलास पाटील यांच्यावर अन्याय होणार हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. जिथ सत्ताधारी आमदारच न्यायाच्या प्रतिक्षेत असतील तिथे विरोधी आमदारांबद्दल न बोललेच बरे, अशी परिस्थिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com