Teachers Constituency : नवख्या किरण पाटलांचा अनुभवी विक्रम काळेंशी सामना ...

Marathwada : भाजपचे उमेदवार किरण पाटील नवखे असले तरी भाजपची मजबुत प्रचार यंत्रणा त्यांच्या पाठीशी आहे.
Marathwada Teachers Constituency News, Aurangabad
Marathwada Teachers Constituency News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad : मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी येत्या ३० तारखेला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. सलग तीनवेळा विजय मिळवत राष्ट्रवादीच्या विक्रम काळे (Vikram Kale) यांनी या मतदारसंघावर आपली मजबुत पकड सिद्ध केलेली आहे. भाजपने उमेदवार बदलण्याचा प्रयोग करत यावेळी नवख्या किरण पाटील यांना काळेंच्या विरोधात निवडणुक रिंगणात उतरवले आहे. अनुभवी विक्रम काळे विरुद्ध नवखे किरण पाटील असा हा सामना अटीतटीचा होणार ? की मग एकतर्फी हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Marathwada Teachers Constituency News, Aurangabad
Devendra Fadnvis : आम्ही जमीनीवरच, हवेत कोण याचा शोध शरद पवारांनी घ्यावा..

दरम्यान, तीनवेळा निवडून आलेल्या विक्रम काळे यांच्या उमेदवारीला विरोध करत पक्षाचे वक्ता सेलचे प्रमुख प्रदीप सोळुंके यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली होती. त्यामुळे उमेदवारीवरून (Ncp) राष्ट्रवादीत महाभारत घडते की काय? अशी चर्चा होती, पण सलग तीनवेळा विजय मिळवलेल्या काळे यांनाच मैदानात उतरवण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ११ जानेवारी रोजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत मोठ्या शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

एकंदरित काळेंच्या नावाला विरोध करणाऱ्या प्रदीप सोळुंके यांना शांत करण्यात आल्याचे बोलले जाते. भाजपने किरण पाटील यांची उमेदवारी दोन महिन्यापुर्वीच जाहीर केली होती. किरण पाटील हे औरंगाबादचे असले तरी ज्या लातूर आणि औरंगाबाद जिल्ह्यात भाजपचा प्रभाव आहे, त्याच ठिकाणी सर्वाधिक शिक्षक मतदार असल्याने पक्षाकडून विजयाची खात्री व्यक्त केली जात आहे. परंतु किरण पाटील यांची पाटी कोरी आहे, तर विक्रम काळे यांच्याकडे गेल्या तीन टर्मच्या कारकीर्दीत शिक्षकांचे कोणते प्रश्न धसास लावले हे सांगण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत.

विशेषतः करोना काळात शिक्षकांच्या वेतनात कपात करू नये यासाठी काळे यांनी केलेला पाठपुरावा आणि त्यामुळे शिक्षकांना मिळालेले पुर्ण वेतन ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. कायम विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नासाठी काळे यांनी विधान परिषदेत वेळोवेळी आवाज उठवल्याचा दावा केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवार अर्थमंत्री असल्यामुळे त्याचा देखील फायदा शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी झाल्याचा मुद्दा काळे प्रचारात प्रकर्षांने मांडू शकतात.

भाजपचे उमेदवार किरण पाटील नवखे असले तरी भाजपची मजबुत प्रचार यंत्रणा त्यांच्या पाठीशी आहे. याचा निश्चितच त्यांना फायदा होवू शकतो. गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षक मुख्यालयी न राहता घरभाडे भत्ता उचलतात असा मुद्दा मुंबईच्या अधिवेशनात उचलून राज्यभरातील शिक्षकांची नाराजी ओढावून घेतली होती. परंतु भाजपने हा मुद्दा प्रचारात डोकेदुखी ठरू नये याची काळजी घेत बंब यांचे ते वैयक्तिक मत असल्याचे सांगत हात झटकले होते.

Marathwada Teachers Constituency News, Aurangabad
Hingoli Earthquake : लोक साखरझोपेत असतांना भुकंपाचे सौम्य धक्के...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी किरण पाटील यांची उमेदवारी जाहीर करताच ही भूमिका स्पष्ट केली होती. विक्रम काळे यांच्या विरोधात जी काही नाराजी असले त्याचा फायदा भाजप कसा करून घेते यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. आमदार विक्रम काळे यांचा संपर्क दांडगा आहे. या मतदारसंघात ६१ हजार ५२९ मतदार आहेत.

त्यात ४६ हजार ७८० पुरुष, तर १४ हजार ७४९ महिला मतदारांचा समावेश आहे. १२ जानेवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. तुर्तास मराठवाडा शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी थेट लढत अपेक्षित आहे. पण उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावरच खरे चित्र स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com