औरंगाबाद : शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळा प्रकरणी आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना पुणे पोलिसांनी काल अटक केली. (TET Scam) सध्या कृषी विभागात उपसचिवपदी कार्यरत असलेल्या खोडवेकरांच्या या `खोड्या`, जुन्यात असल्याचे अनेक प्रकार आता समोर येत आहेत. (Pune)
मुळचे बीड (Sushil Khodwekar) जिल्ह्यातील परळी तालुक्याच्या खोडवा सावरगांवचे सुशील खोडवेकर हे वादग्रस्त अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. (Marathwada) २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या खोडवेकर यांनी लातूर जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी म्हणून २०१२-१३ मध्ये काम केले होते. त्यानंतर राज्याच्या अनेक जिल्ह्यात त्यांनी विविध पदांवर काम केले.
यापैकी परभणी जिल्हा परिषदेत सीईओ आणि नांदेड-वाघाळा महापालिकेत आयुक्त म्हणून त्याची कारकीर्द चांगलीच गाजली होती. परभणी जिल्हा परिषदेत मुख्यकार्यकारी अधिकारी असतांना स्वच्छ भारत अभियानाच्या कंत्राटात त्यांनी कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. हे प्रकरण अगदी विधानसभेत देखील गाजले होते.
परभणी प्रमाणेच नांदेडमध्ये त्यांच्या मनमानी कारभाराला वैतागून राजकीय नेते आणि नांदेडकरांनी त्यांच्या बदलीची वारंवार मागणी केली होती, अशीही माहिती समोर आहे. ठाणे, पालघर, नांदेड-वाघाळा, परभणी आणि पुणे आदी ठिकाणी खोडवेकर यांनी काम केलेले आहे.
ठाणे येथून बीएस्सीची पदवी घेतलेल्या खोडवेकरांनी मुंबईच्या माटुंगा येथे एमएस्सीचे शिक्षण पुर्ण केले होते. २०१० मध्ये झालेल्या युपीएससीच्या परीक्षेत खोडवेकरांची देशात ३११ वी रॅंक होती. मराठवाड्यातील लातूर, परभणी आणि नांदेड या तीन जिल्ह्यात त्यांनी आतापर्यंतच्या प्रशाकीय सेवेचा बराच काळ घालवला. मात्र टीईटी घोटाळ्यात अटक झाल्यानंतर आता मराठवाड्यात वादग्रस्त ठरलेल्या त्यांच्या कारकीर्दीची चर्चा देखील होऊ लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.