उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार सुरुवात केली आहे. पक्षाने राज्यातील 18 ठिकाणी लोकसभा समन्वयकांची नियुक्ती करून बाजी मारली आहे. ज्या लोकसभा मतदारसंघात समन्वयकांची नियुक्ती केली आहे ते मतदारसंघ ठाकरे गटाकडे आल्याचे हे संकेत मानले जातात.
यामध्ये परभणी आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात (Loksabha Election) शिवाजी चौथे आणि संतोष सांबरे यांना, तर हिंगोलीत डॉ. संजय कच्छवे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही, परंतु लोकसभा मतदारसंघात ज्या पक्षाचे विद्यमान खासदार आहे,त त्या ठिकाणी त्या पक्षाला प्रथम प्राधान्य देण्याचे सूत्र आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी हे सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे.
त्यानुसार परभणी लोकसभा मतदारसंघात (Parbhani Loksabha Constituency) परभणी लोकसभा मतदारसंघातील खासदार जाधव ठाकरे गटाचे असल्याने महाविकास आघाडीचे तेच उमेदवार असतील हे स्पष्ट आहे. त्यामुळे पक्षाने परभणी लोकसभा मतदारसंघात समन्वयक नियुक्त केले आहेत.
शिवसेनेतील बंडखोरीनंतर परभणीत फारसा परिणाम जाणवला नाही. परभणी लोकसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहता खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांना जिंकण्याचा आत्मविश्वास असला तरी भाजप पक्षाने जोरदार तयारी केली आहे. जिंतूर विधानसभेच्या आमदार मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांचे संभाव्य उमेदवार म्हणून नाव घेतले जात आहे. भाजपचा आक्रमक प्रचार पाहता जाधव यांनासुद्धा पूर्ण तयारीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागणार आहे.
विशेषतः हिंगोली लोकसभा (Hingoli Loksabha Constituency) मतदारसंघातही समन्वयक नियुक्त केल्याने हिंगोली लोकसभा मतदारसंघातही ठाकरे गट दावा करणार असल्याचे दिसून येते. अनेक दिवसांपासून हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये रस्सीखेच चालू आहे. इथले खासदार हेमंत पाटील शिवसेनेत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे ते प्रमुख दावेदार आहेत.
माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांचेही नाव इच्छुकांच्या यादीत आहे. शिवसेनेतील बंडानंतर त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी निष्ठा राखली. 20 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी वसमत विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच युती सरकारच्या काळात ते कॅबिनेटमध्ये होते.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.