बीड : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरपरिषदेत कंत्राटी कामगार असलेल्या दोन महिला झाडावर चढल्या. (Beed) आपल्याला न्याय मिळत नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्या सांगत होत्या. प्रजासत्ताक दिनाचे महत्व आणि महिला कामगारांनी घेतलेला आक्रमक पावित्रा पाहून अखेर आमदार संदीप क्षीरसागर (Mla Sandeep Kshirsagar) यांनी थेट झाडावर चढून आंदोलनकर्त्या महिलांची समजूत काढली.
लवकरच तुम्हाला न्याय मिळवून देईन, असे आश्वासन दिल्यानंतर सदर महिला झाडावरून खाली उतरल्या आणि पुढील अनर्थ टळला. (Ncp) या संदर्भात आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्वतःच फेसबुकच्या माध्यमातून ही माहिती दिली. (Marathwada) आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बीड नगर परिषदेच्या कंत्राटी महिला कामगार जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणाला बसल्या होत्या.
मागील अनेक वर्षांपासून नुसते आश्वासन देऊन या महिला कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कामगार म्हणून घेतले नाही. बीड नगर पालिकेच्या गलथान कारभाराला कंटाळून आज दोन महिला कामगार चक्क लिंबाच्या झाडावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होत्या. मी लोकप्रतिनिधी या नात्याने आपले प्रश्न सोडवण्यासाठी कायम तत्पर आहे.
झाडावर चढून आत्महत्या करणे पर्याय नाही, असे सांगून मी स्वतः याप्रकरणी लक्ष देईल असा विश्वास, शब्द महिला कर्मचारी, कामगारांना दिला व झाडावरून खाली येण्यासाठी विनंती केली. पूढील काळात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनातून हा प्रश्न नक्कीच मार्गी लागलेला असेल हा माझा शब्द आहे, असेही क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.