High Court News : करुणा मुंडेंसह सात जणांच्या याचिका फेटाळल्या

The bench rejected the petitions of seven persons including Karuna Munde :याचिकांमध्ये अनेक वादग्रस्त प्रश्न आणि मुद्दे आहेत. नामनिर्देशनपत्रे वैध ठरलेल्या उमेदवारांच्या याद्या संबंधीत निवडणूक अधिकाऱ्यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे पाठविल्या आहेत. अशा परिस्थितीत हस्तक्षेप करता येणार नाही.
Karuna Munde News
Karuna Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेची निवडणूकीत नामनिर्देशनपत्रे अवैध ठरलेल्या इच्छुक उमेदवारांच्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे सुटीतील न्यायमूर्ती शैलेश पी. ब्रह्मे यांनी गुरुवारी (ता. 31) फेटाळल्या.

परळी विधानसभा (जि. बीड) मतदार संघातील इच्छुक उमेदवार (Karuna Munde) करुणा धनंजय मुंढे उर्फ करुणा अशोक शर्मा, शहादा (जि. नंदूरबार) येथील आत्माराम प्रधान, लातूर येथील हनमंत मामीडवार आणि लालासाहेब शेख, औरंगाबाद मध्यमधील नितीन बचके आणि नायगाव येथील हनमंतराव वनाळे व मोतीराम कुऱ्हाडे यांची नामनिर्देशनपत्रे छाणणी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरविली होती.

या विरोधात सर्वच उमेदवारांनी खंडपीठात धाव घेतली होती. सुनावणी दरम्यान निवडणूक आयोगातर्फे ॲड. अलोक एम. शर्मा यांनी निदर्शनास आणून दिले की, याचिकाकर्त्यांना निवडणूक याचिकांचा पर्याय आहे. याचिकांमध्ये अनेक वादग्रस्त प्रश्न आणि मुद्दे आहेत. नामनिर्देशनपत्रे वैध ठरलेल्या उमेदवारांच्या याद्या संबंधीत निवडणूक अधिकाऱ्यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे पाठविल्या आहेत.

Karuna Munde News
Karuna Sharma: करुणा शर्मा मुंडे ढसाढसा रडल्या! म्हणाल्या, 'तो राक्षस आहे. मी 26 वर्ष त्याला स्वत:चं रक्त पाजलं...' VIDEO पाहा

अशा परिस्थितीत हस्तक्षेप करता येणार नाही. आपल्या युक्तीवादाच्या पुष्ठ्यर्थ ॲड. शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निवाड्यांचा संदर्भ दिला. (High Court) सुनावणीनंतर खंडपीठाने याचिका फेटाळून लावल्या आहेत. करुणा मुंडे यांनी विधानसभेच्या परळी मतदारसंघातून आपल्या पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

परंतु त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून नाव असलेल्या व्यक्तीने अर्जावर आपल्या नावापुढे असलेली स्वाक्षरी आपली नसल्याचे निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला होता. दरम्यान, यावरून करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल करत या राज्यातील लोकशाही संपल्याचा आरोप केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com