भाजपने ईडीची चव घालवली, त्याला बिडी इतकीही किंमत राहिली नाही

(Ncp Minister Dhnanjay Munde) मुंबईत आणि राज्यात जे सुरू आहे ते देखील लखीमपुरच्या शेतकऱ्यांचे प्रकरण आणि अदानी यांच्या पोर्टवर सापडलेले कोट्यावधी रुपयांचे सापडलेले ड्रग्ज यावरून लक्ष हटवण्यासाठी सुरू आहे
Ncp Leader Dhnanjay Munde
Ncp Leader Dhnanjay MundeSarkarnama
Published on
Updated on

नांदेड ः महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार भक्कम आणि स्थिर आहे. सगळे प्रयत्न करून देखील ते पडत नाही म्हटल्यावर खऱ्या अर्थाने अस्थिर असलेल्या विरोधी पक्षाने केंद्रातील सीबीआय, इन्कम टॅक्स आणि ईडीला हाताशी धरले. रोज एक मंत्री, महाविकास आघाडीचा नेता त्यांच्या निशाण्यावर आहे. खऱ्या अर्थाने भाजपने या तपास यंत्रणांची चव घालवली आहे, ईडीला तर मुजराच्या खिशात असलेल्या बिडी इतकी देखील किमंत राहीली नाही, अशी टीका सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

कुंडलवाडी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी मुंडे यांनी भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मुंडे म्हणाले, मी विधान परिषदेत विरोधी पक्ष नेता आणि फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असतांना त्यांना वारंवार सांगायचो, सल्ला द्यायचो, की तुम्ही पवार साहेबांचा नाद करू नका. पण माझा सल्ला त्यांनी ऐकला नाही, नंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या.

काॅंग्रेस-राष्ट्रवादी सत्तेवर यायचा विषयच नव्हता. ते शंभर पेक्षा जास्त होते. पण होत्याचं नव्हंत आणि नव्हत्यांच होतं करण्याची ताकद शरद पवारांमध्ये होती, म्हणून त्यांनी ६४ आमदार असलेल्या शिवसेनेचा मुख्यमंत्री ५६ सदस्य असलेल्या राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री आणि ४४ आमदारांच्या काॅंग्रेसचा मंत्री केला. आणि १०५ आमदार असलेल्या भाजपला विरोधी पक्षात बसवंल.

आता पाच वर्ष विरोधी पक्षात राहून पुन्हा निवडणुकीला समोर जा, पण नाही सरकार पाडण्यासाठी आणि पुन्हा सत्तेत येण्यासाठी आसुसलेल्या भाजपला राज्यातील जनता पुन्हा कधीच येऊ देणार नाही, असेही मुंडे म्हणाले. शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर तातडीने दोन लाखांची कर्जमाफी दिली. आताही अतिवृष्टी, पूरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले.

Ncp Leader Dhnanjay Munde
"जनाब राऊत तुम्हाला नबाव मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय''

सकाळीच इथे पुन्हा येईन म्हणणारे येऊन गेले. म्हणाले, पॅकेज कुठे गेले, पण या सरकारचा जबादार मंत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो, दिवाळीपुर्वी मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याशिवाय राहणार नाही. पण यांना शेतकऱ्यांबद्दल खोटे प्रेम दाखवायचे आणि तिकडे लखीमपुरमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्याला चिरडून मारणारे यांचेच मंत्री होते.

या घटनेचा निषेध म्हणून आम्ही महाराष्ट्र बंद पुकारला तर यांनी पाठिंबा द्यायचे सोडून विरोध केला. आज मुंबईत आणि राज्यात जे सुरू आहे ते देखील लखीमपुरच्या शेतकऱ्यांचे प्रकरण आणि अदानी यांच्या पोर्टवर सापडलेले कोट्यावधी रुपयांचे सापडलेले ड्रग्ज यावरून लक्ष हटवण्यासाठी सुरू आहे, असा आरोप देखील मुंडे यांनी केला.

विश्वगुरू होणाऱ्या पक्षाला उमेदवार मिळाला नाही

भाजपने या पोटनिवडणुकीत संवेदनशीलता दाखवून जितेश अंतापूरकर याला बिनविरोध निवडून आणण्याची भूमिका घ्यायला हवी होती. आतापर्यंत महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात असे निर्णय अनेकदा घेतले गेले. भाजपचे १०५ आमदार आहेत, १०६ झाले असते तरी काहीच फरक पडला नसता. पण घाणेरडे राजकारण करत त्यांनी ही निवडणूक लादली.

यांचे नेते देशाचे पंतप्रधान विश्वगुरू व्हायला निघालेत, पण यांना या मतदारसंघात उमेदवार मिळाला नाही, उपऱ्याला पक्षात घेऊन निवडणूक लढवावी लागत आहे, यापेक्षा मोठे दुर्दैव नाही, अशी टीकाही मुंडे यांनी केली. मराठा-ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून आता दोन समाजामध्ये भांडण लावायचे काम भाजपने सुरू केले आहे.

माझे त्यांना आव्हान आहे, ज्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या विचारधारेवर तुम्ही चालता, त्या आरएसएसच्या कार्यकारणीच्या बैठकीत मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा ठराव आणून दाखवा, मी आयुष्यभर तुमची गुलामी करेन. ज्या आरएसएसचा आरक्षणाला कायम विरोध होता, त्या विचारांच्या भाजपचा आरक्षणाला पाठिंबा कसा असू शकेल?असा सवाल देखील मुंडे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com