Beed : संभाजीराजे छत्रपतींची चाढ्यावर मुठ अन् हातात चटणी भाकर..

शेतकऱ्यांचीही नेमकी दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. शेतकऱ्यांनी कपड्यातील भाकरी व चटणी काढली व संभाजीराजेंच्या हाती दिली. त्यांनीही प्रेमाचे चार घास खाल्ले. (Beed News)
Chhatrapati Sambhajiraje In Beed District
Chhatrapati Sambhajiraje In Beed DistrictSarkarnama

बीड : पाऊस - पेरणीच्या दिवसांत जसा एखादा शेतकरी काम उरकल्यानंतर हातावर चटणी भाकर घेऊन दोन घास खातो, तसेच छत्रपती महाराजांचे कोल्हापूरच्या गादीचे वंशज संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) छत्रपतींनीही सोमवारी जिल्हा दौऱ्यात शेतात तिफणीच्या चाढ्यावर मुठ धरली आणि हातावर घेऊनच चटणी भाकरीचे चार घास खाल्ले.

संभाजीराजे छत्रपती सोमवारी जिल्हा दौऱ्यावर होते. (Beed) त्यांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र नारायणगडावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. तसेच गेवराईतही त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाले. (Marathwada) गेवराई तालुका दौऱ्या दरम्यान संभाजीराजे छत्रपती तलवाडा भागातही पोचले. यावेळी शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरु होत्या.

मधल्या काळात उघडीप दिलेल्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी पेरणीत मग्न असतांना संभाजीराजे छत्रपती आल्यानंतर शेतकरी जमले. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी अनेक प्रश्नांवर खलही केला. यावेळी संभाजीराजेंनीही खालून पँट दुमडून पायातील पायतान काढून चिखल तुडवित चाढ्यावर मुठ धरुन पेरणीचे काही तास केले.

Chhatrapati Sambhajiraje In Beed District
बाळासाहेब ठाकरे लोकनेते, त्यांचे नाव घेण्याचा सर्वांना अधिकार ; संभाजीराजेंचे रोखठोक बोल

त्यानंतर शेतकऱ्यांचीही नेमकी दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. शेतकऱ्यांनी कपड्यातील भाकरी व चटणी काढली व संभाजीराजेंच्या हाती दिली. त्यांनीही प्रेमाचे चार घास खाल्ले. यावेळी बाजूलाच असलेल्या शेतकऱ्याच्या मुलालाही संभाजीराजेंनी प्रेमाणे घास भरविले. छत्रपती संभाजीराजेंचा हा साधेपणा पाहून उपस्थितीत चांगलेच भारावले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com