सरकार तुमचं आहे, चौकशी करा, मगच बोला ; दानवेंचा रोहित पवारांना सल्ला

(Central State Railway Minister Raosaheb Danve) घटनेची चौकशी करून निष्कर्ष निघाल्यानंतरच अशा प्रकारचे वक्तव्य रोहित पवार यांनी करायला हवे होते. त्यांचा आरोप राजकीय हेतूने प्रेरीत
Mla Rohit Pawar-Raosaheb Danve
Mla Rohit Pawar-Raosaheb DanveSarkarnama
Published on
Updated on

जालना : अहमदनगर दुर्घटना प्रकरणी रोहित पवारांनी केलेल्या टिकेला रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सरकारचं त्यांचे आहे, या घटनेची चौकशी करून निष्कर्ष निघाल्यानंतरच अशा प्रकारचे वक्तव्य रोहित पवार यांनी करायला हवे होते. त्यांचा आरोप राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचे केंद्रीय रेल्वे कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांची मागणी रास्त असून राज्य सरकारनं त्याकडे सहानुभूतीने पहावे, असेही दानवे म्हणाले. अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयसीयूमध्ये आग लागून काल अकरा रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आगीवरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये राजकारण सुरु झाले आहे.

हॉस्पिटलमध्ये देण्यात आलेले व्हेंटिलेटर हे पीएम केअरमधून मिळाल्याचे सांगत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला होता. रोहित पवार यांच्या या टीकेला रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिले आहे. दुर्घटनेच्या ठिकाणी संयमाने स्टेटमेंट करायला हवे, अशा पद्धतीने ही राजकारण करायची वेळ नाही.

रोहित पवार यांनी केलेले आरोप हे राजकीय हेतूने प्रेरीत असून सरकार त्यांचं आहे, आग प्रकरणाची चौकशी करून निष्कर्ष निघाल्यानंतरच त्यांनी या विषयावर वक्तव्य करावे, असा सल्ला दानवे यांनी रोहित पवार यांना दिला.

एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी संपाचं हत्यार उपसलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांची मागणी रास्त असून राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे सहानुभूतीने पाहून त्यांच्या मागणीवर विचार करावा, असे आवाहन देखील दानवे यांनी केले.

Mla Rohit Pawar-Raosaheb Danve
हॉटेल ललितमध्ये कबाब, शबाब, शराब अन् नवाब ही जुगलबंदी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com