Maratha Aarakshan: सरकारच्या शिष्टमंडळाने आता अध्यादेशाचा कागदच घेऊन यावे: जरांगेंचे आव्हान

Jalna Maratha Protest: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर मनोज जरांगे अधिक आक्रमक झाले आहेत.
Manoj Jarange
Manoj Jarange Sarkarnama
Published on
Updated on

Jalna Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांनी केलेल्या मागणीनंतर राज्य सरकारने नुकतीच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र "राज्य सरकारने मागचेच पाढे वाचले, आमची मागणी मान्य केली नाही, आरक्षणाबाबत निर्णयच घेतला नाही, असं वाटतयं, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आता हे प्रकरण आणखीच चिघळणार, असल्याची चिन्हे दिसू लागली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर मनोज जरांगे अधिक आक्रमक झाले आहेत. आपली मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आपण उपोषण थांबवणार नाही, अशी भूमिकाच त्यांनी घेतल्याचे दिसत आहे.

Manoj Jarange
Wadettiwar On Jalna Protest: मराठा समाज ‘जनरल डायर’ला शोधून काढेल, अन् चांगला धडा शिकवेल !

जरांगे म्हणाले, " राज्य सरकारने मराठा आरक्षणासंबंधी काही निर्णय घेतला असेल असे वाटत नाही. पण त्यांचे जे मुद्दे माझ्यापर्यंत आले त्यावरून त्यांनी पहिलेच पाढे वाचले हे लक्षात आलं. मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या सवलती देण्याबाबत चर्चा झाली, असं माझ्या कानावर आलं. पण आतापर्यंत आमच्या एकाही मागणीची अंमलबजावणी झाली असावी, असं वाटतं नाही. सगळ्यांची मंजूरी आणि विषय प्रोसिडिंगला गेला असावा, पण या सगळ्यात एकच गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे आरक्षणाचा निर्णय अद्यापही झालेला नाही.''

आता आम्ही सरकारचे शिष्टमंडळ येण्याची वाट पाहत आहोत. सरकारच्या शिष्टमंडळाने आता अध्यादेशच घेऊन यावा. विनाकारण नुसत्या बैठका घेऊ नये. आता आरक्षणासाठी लढणाऱ्या पिढीला नुसत्या बैठका अपेक्षित नाहीत. चर्चेशिवाय मार्ग निघणार नाही हेही खरे, पण सरकारनेही पहिलेच पाढे वाचू नये, असा टोलाही जरांगे यांनी लगावला.

Manoj Jarange
Wadettiwar On Jalna Protest: मराठा समाज ‘जनरल डायर’ला शोधून काढेल, अन् चांगला धडा शिकवेल !

सरकारने आरक्षण जाहीर केलं की नाही केलं. हे पत्रकार परिषदेत बोलण्यापेक्षा सरकाने मराठा समाजाला १०० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असेल, राज्य सरकारचे शिष्टमंडळ अध्यादेशाचा कागदच घेऊन येईल, असा विश्वासही जरांगे यांनी व्यक्त केला. आम्ही आतुरतेने सरकारच्या शिष्टमंडळाची वाट बघतोय. पण अध्यादेश आला नाही तर आंदोलन थांबणार नाही. आणि उद्यापासून पाण्याचा घोटही घेणार नाही, असा निर्वाणीचा इशाराच मनोज जरांगे यांनी दिला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com