पालकमंत्र्यांनी शब्द पाळला; औरंगाबाद जिल्ह्यासाठी पाचशे कोटींचा निधी मंजुर

सुभाष देसाई यांनी देखील जिल्ह्याला पाचशे कोटींचा निधी मिळवून देवू, असा शब्द दिला होता. अखेर त्यांनी तो खरा करून दाखवला. (Subhash Desai)
Guardian Minister Subhash Desai
Guardian Minister Subhash DesaiSarkarnama

मुंबई : राज्य शासनाने औरंगाबाद जिल्ह्यासाठी २०२२-२३ या वर्षासाठी ५०० कोटींचा वार्षिक योजना निधी मंजूर केला आहे. पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी ही माहिती दिली. (Aurangabad) जिल्ह्यातील वाढलेली शहरी लोकसंख्या तसेच मराठवाड्यातील व अन्य जिल्ह्यातील रुग्णांना शहरात सहज उपलब्ध होणाऱ्या दर्जेदार शासकीय वैद्यकीय सेवांकडे सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे लक्ष वेधले होते. (Shivsena) परिणामी जिल्ह्याचा वार्षिक योजना निधी ५०० कोटी पर्यंत वाढविण्यात आला आहे.

सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व जनतेच्यावतीने आभार मानले. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत गेल्या महिन्यात औरंगाबादेत झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी अतिरिक्त निधीची मागणीी केली होती. दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे विकासकामांना पुरेसा निधी मिळाला नव्हता. त्यामुळे अनेक कामे रखडली होती.

परंतु कोरोना सारख्या जागतिक महामारीशी लढण्यासाठी वैद्यकीय सेवा आणि त्या संदर्भातील इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी प्राधान्याने निधी द्यावा लागला. आता कोरोनाचे संकट टळले असून राज्याची आर्थिक घडी देखील पुर्वपदावर आली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यासाठी वाढीव निधी देण्याची मागणी जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांकडे केली होती.

Guardian Minister Subhash Desai
रश्मी ठाकरेंचे बंगले दाखवण्यासाठी किरीट सोमय्या उद्या कोर्लईत

सुभाष देसाई यांनी देखील जिल्ह्याला पाचशे कोटींचा निधी मिळवून देवू, असा शब्द दिला होता. अखेर त्यांनी तो खरा करून दाखवला. मुंबईत झालेल्या बैठकीत औरंगाबाद जिल्ह्याच्या वार्षिक विकास योजनांसाठी पाचशे कोटींचा निधी देण्यास मान्यता देण्यात आली आहे. गेल्या वर्षी हा निधी ३८५ कोटी इतका होता. त्यात आता ११५ कोटींची वाढ करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com