लातूरचे पालकमंत्री बाभळगांवला गडकरींनी केलेल्या रस्त्यानेच जातात ; निलंगेकरांचा टोला

(Nitin Gadkari's visit was very beneficial for the district) लातूर जिल्हा व त्याचा शैक्षणिक पॅटर्न राज्यात व देशात ओळखला जातो.
Mla Sambhaji Patil Nilangekar-Amit Deshmukh
Mla Sambhaji Patil Nilangekar-Amit DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

लातूर ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या १ हजार ८३ कोटींच्या विविध रस्ते महामार्ग, पुलांच्या कामांचा शुभारंभ काल झाला. जिल्ह्यात पाच हजार कोटी रुपयांची कामे सुरू आहेत आणि भविष्यात देखील आपण लातूरला आणखी तीन-चार हजार कोटी देऊ, असे आश्वासन देखील नितीन गडकरी देऊन गेले. त्यामुळे कालचा नितीन गडकरी यांचा दौरा जिल्ह्यासाठी चांगलाच लाभदायक ठरला असे म्हणावे लागेल.

अर्थात भाजपच्या संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना या विकासकामांचा फायदा भविष्यात होणारच आहे. पण या दिमाखदार सोहळ्यात देखील आपल्या विरोधकांवर टीका करण्याची संधी संभाजी पाटील निलंगेकर यांनी सोडली नाही. गडकरी साहेब तुम्ही या जिल्ह्याला इतके दिले आहे, की लातूरचे पालकमंत्री आपल्या बाभळगांवला ज्या रस्त्यावरुन जातात तो देखील आपण करून दिलेला आहे, याचा आवर्जून उल्लेख करत निलंगेकरांनी अमित देशमुख यांना टोला लागवला.

राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सगळ्याच राजकीय पक्षांचे जिल्ह्यातील नेते उपस्थित होते. पण वरचष्मा राहिला तो भाजपचाच. माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे आजारी असतांना देखील कार्यक्रमाला उपस्थीत राहिले. गडकरी यांनी त्यांना आजारी असल्यामुळे तुम्ही येऊ नका, असा निरोप पाठवला होता.

पण निलंगेकरांना एवढी मोठी संधी दवडवायची नव्हती. त्यामुळे आपल्या छोटेखानी भाषणात देखील त्यांनी पालकमंत्र्यांचा समाचार घेण्याची संधी सोडली नाही. निलंगेकर भाषणाला आले तेव्हा उपस्थितांमधून देखील टाळ्यांचा गडगडाट झाला, त्यामुळे एकप्रकारे तिथे निलंगेकरांनी शक्तीप्रदर्शन देखील केले.

Mla Sambhaji Patil Nilangekar-Amit Deshmukh
जिल्ह्यातले साखर कारखाने पश्चिम महाराष्ट्रातील पुढाऱ्यांच्या घशात; तेरणा तानाजी सावंतांनी घेतला

लातूर जिल्हा व त्याचा शैक्षणिक पॅटर्न राज्यात व देशात ओळखला जातो. लातूरमधूनच सर्वाधिक विद्यार्थी मेरीटमध्ये येतात, इंजिनिअर, सरकारी अधिकारी होतात असे सांगत मग लातूरला केंद्रीय विद्यापीठ मिळालेच पाहिजे, अशी मागणी देखील निलंगेकर यांनी गडकरी यांच्याकडे केली. पालखी मार्ग, लिंकरोड, टेभुर्णी राष्ट्रीय महामार्ग अशा अनेक मागण्या करत निलंगेकर यांनी आपली छाप या कार्यक्रमात पाडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com