Nanded : खासदार चिखलीकर म्हणतात, नांदेडात मटका, जुगार जोरात..

राज्यात सर्वात जास्त मटका, जुगार हा नांदडमध्ये खेळला जातो आणि पोलिस हप्ते गोळा करण्यात मश्गुल आहेत. (Pratap Patil Chikhlikar)
Mp Pratap Patil Chikhlikar, Nanded
Mp Pratap Patil Chikhlikar, NandedSarkarnama
Published on
Updated on

नांदेड : सार्वजनिक बाधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कालच जिल्ह्यातील विकास कामांमुळे मुंबईत नांदेडची चर्चा होत असल्याचा दावा केला होता. (Nanded) एवढेच नाही तर या विकास कामांमुळे काहीजणांना पोटदुखी सुरू झाली आहे, असा टोला देखील भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांना लगवाला होता. (Marathwada) त्यानंतर आज चिखलीकर यांनी पलटवार करत राज्यात सर्वाधिक मटका नांदेडमध्ये सुरू असल्याचा आरोप केला आहे.

पोलिसांच्या निष्क्रियतेवर टीका करतांनाच त्यांनी अप्रत्यक्षरित्या पालकमंत्र्यांना लक्ष्य केल्याचे यावरून स्पष्ट होते. शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक बियाणी यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या झाल्यानंतर चिखलीकर यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. नांदेड पोलिसांवर आपला विश्वास नसून पाच दिवसांत हल्लोखोरांना अटक करा, अन्यथा रस्त्यावर उतरू अशा इशारा देखील त्यांनी दिला होता.

एकंदरित जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था व अवैध धंद्याच्या मुद्यावरून चिखलीकर पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधू पाहत आहेत. एककीडे अशोक चव्हाण विकासकामांचे दाखले देत मुंबईत नांदेडची चर्चा होत असल्याचे सांगतात, तर दुसरीकडे याच जिल्ह्याचे खासदार मात्र नांदेडमध्ये सर्वाधिक मटका सुरू असल्याचा आरोप करतात. या विरोधाभासामुळे जिल्ह्यात कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याचे स्पष्ट होते.

Mp Pratap Patil Chikhlikar, Nanded
AIMIM : राज ठाकरेंच्या सभेवर एमआयएमच्या `हाताची घडी तोंडावर बोट`चे रहस्य काय ?

पोलिसांच्या कामगिरीबद्दल असमाधान व्यक्त करतांनाच चिखलीकर म्हणाले, राज्यात सर्वात जास्त मटका, जुगार हा नांदडमध्ये खेळला जातो आणि पोलिस हप्ते गोळा करण्यात मश्गुल आहेत. पुरावा म्हणून मटक्याच्या चिठ्ठ्या गेल्या शंभर दिवसांपासून मी जमा केले आहेत. मटका, अवैध धंदे वाढल्याने जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. जिल्ह्यात सुरू असलेला अवैध मटका बंद करावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपण लवकरच भेटणार असल्याचेही चिखलीकर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com