Marathwada News : (तुषार पाटील) राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून समाज आक्रमक झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन, निदर्शने सुरू आहेत. समाजाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले, पण माणुसकी धर्मही जपल्याची अनेक उदाहरण समोर येत आहेत. (Maratha Protest News) जाळपोळ, हिंसक घटनांचा उल्लेख वारंवार केला जातो, पण या दरम्यान, आंदोलकांनी माणुसकीचे दर्शन घडवल्याचे मात्र कुणी सांगत नाही. आंदोलकांनी माणुसकी धर्म जपत आंदोलनातही आपले वेगळेपण दाखवून दिल्याची घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातून समोर आली आहे.
भोकरदन तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सलग दोन दिवस रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. काल दि. ३० रोजी या रास्ता रोकोचा फटका परराज्यातून वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांना बसला. (Jalna) रास्ता रोकोमुळे वाहने मागे नेता येईना आणि पुढेही. आंदोलक आक्रमक असल्यामुळे कुठलाही प्रयत्न अंगाशी येईल, अशी परिस्थिती. त्यामुळे भरलेला ट्रक जागेवर उभार करून आंदोलन संपण्याची वाट पाहण्याशिवाय चालकांकडे दुसरा पर्याय नव्हता.
जालना- जळगाव महामार्गावर डावरगाव फाटा सकाळपासून तब्बल १२ तासापासून चक्काजाम आंदोलन सुरू होते. त्यामुळे इथे रांगा लागलेल्या ट्रक आणि त्यांच्या चालकांची उपासमार होत होती. ट्रकचालकांसोबत काही प्रवाशीही होते. (Maratha Reservation) सकाळपासून ट्रक एकाच ठिकाणी उभ्या होत्या, तर त्यांचे चालक आंदोलन संपण्याची वाट पहात उपाशीपोटी मिळेल त्या जागेवर बसून होते. (Marathwada) त्यांची ही अवस्था पाहून आंदोलकांनी मग माणुसकी धर्माला जागत या सर्व ट्रकचालक व त्यांच्यासोबतच्या इतर प्रवाशांच्या जेवणाची व्यवस्था केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वालसा(खालसा), वालसा, डावरगाव, बेलोरा या गावातील आंदोलनकर्त्यांनी एकत्र येऊन या सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. ज्या ठिकाणी चक्काजाम करण्यात आला तेथे आसपास कुठलेही हॉटेल किंवा दुसरी व्यवस्था नसल्याने उपाशीपोटी बसलेल्या ट्रक व इतर वाहनचालकांना पोटभर जेवण मिळाले आणि त्यांनी तृप्तीचा ढेकर दिला. आंदोलक आणि ग्रामस्थांनी पाचशे लोकांची भूक भागेल एवढ्या स्वयंपाकाची तयारी केली. रात्री साडेआठ वाजता जालना- जळगाव रस्त्यावर चक्क लग्नाच्या पंगती बसाव्यात, अशा पद्धतीने या सर्व ट्रक चालक व इतर प्रवाशांच्या पंगती बसल्या.
चारही गावातील युवक व मराठा बांधवांनी सर्व साहित्य आणून प्रत्येकाला आग्रहाने जेवू घातले. चक्काजामुळे त्रस्त झालेल्या परराज्यातील ट्रकचालकांना हा अनोखा सुखद धक्काच होता. विशेष म्हणजे ट्रक चालकांसोबत बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही आंदोलकांनी जेवण दिले. संपूर्ण देशात आमचा वर्षभर प्रवास सुरू असतो. चक्काजाम, बंद, रास्ता रोको, ट्रकची तोडफोड आम्ही अनेकदा अनुभवतो. मात्र आंदोलनकर्त्यांनीच आग्रहाने भोजन दिले व आम्हाला कुठलाही त्रास न देता आपुलकीने पाहुणचार केला हे पहिल्यांदाच अनुभवत असल्याची प्रतिक्रिया जम्मू कश्मिरहून आलेल्या ट्रक चालक काका चौधरी यांनी यावेळी दिली.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.