तुमच्या कृतीतून खुशामतखोरीचा संदेश जातो, तलावाला दिलेले माझे नाव काढा

याला स्पष्ट भाषेत राजकारण्यांची खुशामत म्हणतात. दुर्दैवाची बाब म्हणजे, या प्रकल्पांचे नावांसहित उदघाटन करताना कोणालाही वावगे वाटले नसल्याचा खेद वाटतो आहे. (Vijaya Rahatkar)
Vijaya Rahatkar-Astikkumar Pandey
Vijaya Rahatkar-Astikkumar PandeySarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत राबवण्यात येत असलेल्या अनेक उपक्रमांना महापालिका (Aurangabad) प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी मंत्री, खासदार, आमदारांची नावे दिल्याचा प्रकार सध्या राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे. (Bjp) औरंगाबादकरांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केल्यानंतर लोकप्रतिनिधीनींही आमची नावे नको, समाजसुधारक, महापुरूष, पर्यावरणवादी किवां या प्रकल्पांसाठी ज्यांनी कष्ट घेतले त्यांची नावे द्या, (Vijaya Rahatkar) अशी भूमिका घेत पत्रव्यवहार सुरू केला आहे.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि शहराच्या माजी महापौर विजया रहाटकर यांनी देखील मनपा प्रशासकांना पत्र पाठवून खेद व्यक्त केला आहे. रहाटकर यांचे देखील नाव एका प्रकल्पाला देण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर आज रहाटकर यांनी आस्तिककुमार पांडेय यांना पत्र पाठवत माझे नाव तर काढाच, पण इतर राजकारण्यांची नावे देखील नकोच, अशी भूमिका मांडली.

रहाटकर यांनी लिहलेल्या पत्रात नमूद केले आहे की, शहरातील खाम नदी पात्रातील विविध प्रकल्पांना आपण सर्वपक्षीय नेत्यांची नावे दिल्याची माहिती माध्यमांतून समजली. त्यात माझेही नाव उन्नती तलावासाठी दिल्याचे माध्यमांतूनच समजले आणि सखेद धक्काच बसला. एक तर मला कल्पना न देता, किंवा माझी संमती न घेता परस्परच असे नाव देणे अयोग्य आहे. पण त्याही पलीकडे जाऊन हयात असलेल्या राजकारण्यांची नावे अशा प्रकारे देण्यास माझा सैद्धांतिक विरोधच आहे.

Vijaya Rahatkar-Astikkumar Pandey
सत्तारांकडून दानवेंना पुन्हा चकवा : भाजपचे सहापैकी चार नगरसेवक शिवसेनेत

खरे तर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत झालेल्या या कामांना महापुरूषांची नावे देता आली असती किंवा औरंगाबादकरांसाठी अतुल्य योगदान देणारे, विविध क्षेत्रात शहराचे नाव उज्ज्वल करणाऱ्या नामवंतांची नावे देता आली असती. अशा मान्यवरांचा आपल्याकडे अजिबात दुष्काळ नाही. पण तरीही आपण हयात असलेल्या स्थानिक राजकारण्यांची व काही विशिष्ट मंत्र्यांची नावे प्रकल्पांना देता, हे पटण्यासारखे नाही.

याला स्पष्ट भाषेत राजकारण्यांची खुशामत म्हणतात. दुर्दैवाची बाब म्हणजे, या प्रकल्पांचे नावांसहित उदघाटन करताना कोणालाही वावगे वाटले नसल्याचा खेद वाटतो आहे. कदाचित हेतू चांगला असेलही; पण त्यातून जाणारा खुशामतखोरीचा संदेश खचितच चांगला नाही. सबब, कृपया माझे नाव कुठेही दिले असल्यास (कारण अधिकृत माहिती नाही किंवा उदघाटनाचेही निमंत्रण नव्हते) ते रद्द करण्यात यावे. त्याचबरोबर शहराची माजी महापौर म्हणून महापालिका प्रशासनाला माझी सूचना आहे, की अन्य नेत्यांचीही नावे रद्द करावीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com