औरंगाबादचे पुढील खासदार खैरेच, जिल्ह्यातील सर्व निवडणूकाही त्यांच्याच नेतृत्वात लढवू

खैरे यांनी देखील जुने वाद विसरून सत्तार यांना विजयाबद्दल लाडू भरवला, तर सत्तार यांनी खैरेंची पेढे तुला करत मैत्रीचा हात पुढे केला. ( Sattar-Khaire)
Chandrakant Khaire-Abdul Sattar
Chandrakant Khaire-Abdul SattarSarkarnama

सोयगाव : औरंगाबादचे पुढील खासदार शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेच असतील. एवढेच नाहीतर यापुढच्या जिल्ह्यातील सगळ्याच निवडणूका खैरे (Chandrakant Khaire) यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जातील. (Shivsena) या शिवाय जिल्ह्यातील पक्षाची ध्येय धोरणं आणि महत्वाचे निर्णय देखील नेते म्हणून तेच घेतील, असे सांगत शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पक्षातंर्गत विरोधकांना धक्का दिला आहे.

सत्तार यांनी मंगळवारी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर विजयी जल्लोष केला, यावेळी भविष्यात सिल्लोड-सोयगांव मतदारसंघ तसेच जिल्ह्यात शिवसेनेची वाटचाल आणि घोडदौड खैरे यांच्या नेतृत्वाखाली अशीच सुरू राहील, असा विश्वासही व्यक्त केला.

सोयगाव नगरपंचायतीच्या निवडणुकी निमित्ताने जिल्ह्यातील राजकारण चागंलेच ढवळून निघाले आहे. जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत समर्थकाचा पराभव झाल्यानंतर सत्तार यांनी केबिननेट मंत्री संदीपान भुमरे, भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे, शिवसेना आमदार अंबादास दानवे व काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे यांच्यावर तोफ डागत त्यांना आगामी निवडणुकीत याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता.

इशारा देऊन सत्तार थांबले नाही, तर त्यांनी थेट शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याशी हातमिळवणी करत त्यांचे नेतृत्व स्वीकारल्याचे देखील पहायला मिळाले. मंगळवारी सोयगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची प्रत्यक्ष उपस्थिती बरीच बोलकी ठरली. विजयी जल्लोषापासून मिरवणूकीत देखील खैरे हेच केंद्रस्थानी होते.

खैरे यांनी देखील जुने वाद विसरून सत्तार यांना विजयाबद्दल लाडू भरवला, तर सत्तार यांनी खैरेंची पेढे तुला करत मैत्रीचा हात पुढे केला. जिल्ह्याचे पुढील खासदार चंद्रकांत खैरे हेच असतील, अशी घोषणाच सत्तार यांनी सोयगावातून करून टाकली . एवढेच नाही, तर जिल्ह्यातील यापुढील सगळ्याच निवडणुका या खैरेंच्या नेतृत्वाखालीच लढवल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Chandrakant Khaire-Abdul Sattar
भुमरे-दानवे विरोधात जाताच सत्तारांसाठी खैरे झाले आदरणीय नेते..

जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत झालेल्या सत्तार-भुमरे यांच्या वादाचे हे पडसाद असल्याची चर्चा देखील या निमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सोयगाव नगरपंचायतीत निर्विवाद सत्ता स्थापन झाल्यानंतर सत्तार यांनी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा पहिला निर्णय जाहीर केला. सोबतच सोयगावला स्वच्छ पाणी तसेच पायाभूत सुविधा व सोयगावच्या सर्वांगीण विकास साधण्यात नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व नगरसेवक कमी पडणार नाहीत, असा विश्वास देखील व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com