Rohit Pawar Press : भाजप बिथरलाय म्हणूनच कुटुंब, पक्ष फोडण्याचे उद्योग ; रोहित पवार कडाडले..

NCP : लोकांच्या मनात सत्ताधाऱ्यांबद्दल असलेली खदखद मतदानातून बाहेर येणारच आहे.
Rohit Pawar News
Rohit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : जो विचार शरद पवार साहेबांनी ६० वर्षे नाकारला, त्या विचारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट गेला आहे. (Rohit Pawar Press) भाजपमधील कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा विश्‍वास उडाला आहे. ते घाबरले आहेत, म्हणूनच पक्ष आणि कुटुंब फोडण्याचे उद्योग त्यांनी सुरू केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला. छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलतांना त्यांनी विविध विषयांवर आपली मतं मांडली.

Rohit Pawar News
Sharad Pawar On Age : वय काढणाऱ्या पत्रकाराला पवार म्हणाले, माझ्याशी कुस्ती खेळता का ?

लोकांच्या मनात सत्ताधाऱ्यांबद्दल असलेली खदखद मतदानातून बाहेर येणारच आहे. म्हणूनच पक्ष, कुटूंब ते फोडत आहेत. (Sharad Pawar) शरद पवार यांचा संघर्ष विचारांचा आहे, सत्तेचा नाही, असेही रोहित पवार म्हणाले. उद्या (ता.१७) रोजी बीडमध्ये शरद पवार यांची सभा होत आहे. या सभेसाठी शरद पवार, रोहित पवार (Rohit Pawar) शहरात आले होते. साहेबांनी जो विचार जपला, त्या विचाराचे लोकच आता राष्ट्रवादीत शिल्लक आहेत. थोडीफार पडझड झाली, मात्र तिथे दुसऱ्या फळीतील निष्ठावंतांनी मोकळा श्वास घेतला आहे.

कामासाठी सत्तेत राहण्याची मागणी करत होते, तेच बाहेर पडले आहेत, असा टोलाही त्यांनी अजित पवार व त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना लगावला. (Marathwada) जे लोकात आहेत, ते पवार साहेबांसोबत आहेत. जो गट भाजपसोबत गेला तो भाजपकडे कोणती ताकद आहे, ते कसे अडचणीत आणू शकतात हे आपल्याला माहित आहे. (NCP) हे माहित असतानाही आम्ही लढत आहोत. मी सत्तेत जाण्यासाठी आलो नाही. इथे आलेल्यांना विचार जपायचा आहे, याचवेळी संघर्षही करावा लागणार आहे. ही वाट आम्ही निवडली असेल तर समजून जा कि, तुमच्या कोणत्याही गोष्टीला आम्ही बळी पडणार नाही, अशा इशारादेखील रोहित पवार यांनी भाजपला दिला.

शरद पवारांची उंची मोठी आहे. सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे आणि साहेबांमध्ये समन्वय आहे. जी शंका सामान्य लोकांच्याही मनात नाही, अशी कुणाच्या मनात असेल तर, ती शंका बीडमध्ये १७ तारखेला होणाऱ्या सभेत शरद पवार स्पष्ट करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले कि, २०२४ ला मी पुन्हा येणार आहे. मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांचे २०१९ ला काय झाले हे महाराष्ट्राने पाहिले आहे, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला. मोदी घराणेशाहीवर बोलतात पण त्यांच्याच पक्षाचे ६० खासदार हे घराणेशाहीतून आले आहेत, याची आठवण देखील पवार यांनी यावेळी करून दिली.

हे सरकार आल्यापासून महाराष्ट्र आजारी पडला आहे. शेतकरी, युवकांचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. छत्रपती संभाजीनगरात ६०० कोटींचे मेडिकल पार्क येणार होते. ते गेल्याने ५००० मुलांचे नुकसान झाले आहे. मराठा, धनगर आरक्षणाचा विषय केंद्रात अडकला आहे.आर्थिक स्तरावर आरक्षण मिळाले आहे, त्यामुळे ५० टक्केच्या वर आरक्षण गेले आहे. राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारने केंद्रातील मोठ्या इंजिनला सांगितले तर, हा प्रश्‍न सुटू शकतो. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, सत्ता द्या चार महिन्यात आरक्षण मिळवून देतो. दीड वर्षे झाले त्यांना याचा विसर पडला आहे. भाजप केवळ आरक्षणाचे राजकारण करत असल्याची टीकाही रोहित पवार यांनी केली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com