
Marathwada : नांदेड शहरातील एका मुख्याध्यापकासह सात जणांना सांगली, कोल्हापूरातील भामट्यांनी तब्बल सव्वा कोटींना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पैशांची गुंतवणूक केल्यास जास्त व्याजाचा परतावा, सोबत विदेशी सहल आणि महागड्या गाड्या गिफ्ट मिळतील, अशा थापा या भामट्यांनी मारल्या होत्या. (Fir Filed) या जाळ्यात सुशिक्षित आणि समाज घडवणारे गुरूजीही अडकले.
या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार शहरातील कौठा भागात राहणारे मुख्याध्यापक आनंद रेणुगुंटवार हे पंढरपूरला एका लग्नासाठी गेले होते. (Nanded) तिथे त्यांची कॅपिटल सिकर ट्रेडर्स अॅन्ड डेव्हलपर्स कंपनीचे रोहितसिंग धर्मासिंग सुभेदार (रा. दत्तनगर, किर्लोस्करवाडी रोड, पुलस जि. सांगली), बाबुराव हजारे (रा. कोल्हापूर) यांची भेट झाली. (Marathwada)
ओळख वाढल्यानंतर या दोघांनी व त्यांच्या इतर साथीदारांनी मार्च २०२१ ते आॅगस्ट २०२२ दरम्यान, विविध अमिषं दाखवून त्यांच्याकडून तब्बल १ कोटी १४ लाख रुपये उकळले. विविध कंपन्यांमध्ये हे पैसे गुंतवण्यात आल्याचे सांगण्यात आले, मोठ्या हाॅटेलमध्ये बैठका घेतल्या. करारपत्र करून घेतले त्यामुळे अनेकांनी या कंपनीत गुंतवणूक केली.
सुरूवातीच्या काही महिने परतावा म्हणून व्याजाची रक्कम देखील संबंधितांना दिली. त्यामुळे गुतंवणूकदारांचा संबंधितांवर विश्वास बसला. पण नंतर मात्र कंपनीने परतवा आणि मुद्दल देण्यास देखील टाळाटाळ सुरू केली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आनंद रेणुगुंटवार यांनी वजिराबाद पोलीस स्टेशन गाठत संबंधितांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार हे करत आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.