Gangapur Assembly Constituency : लोकसभेत महायुतीला लीड देणाऱ्या आमदार प्रशांत बंब यांचे नाणे खणखणीत.

Lok Sabha Election 2024 : भाजपच्या नाराजीचा फटका संदीपान भुमरे यांना बसेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण भाजपने आपली सगळी यंत्रणा भुमरे यांच्यासाठी कामाला लावली हे निकाल आणि त्यांना मिळालेल्या मताधिक्याने स्पष्ट झाले.
MLA Prashant Bamb
MLA Prashant BambSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar news : लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीची इभ्रत संभाजीनगर ने राखली. संदीपान भुमरे यांनी मिळवलेल्या विजयात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी खेळलेले मराठा कार्ड कमालीचे यशस्वी ठरले. संदीपान भुमरे यांनी एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांचा तब्बल 1 लाख 35 हजाराच्या मताधिक्याने पराभव केला.

शहरातील तीन विधानसभा मतदारंसघांपेक्षा ग्रामीण मधील मतदारसंघांनी यात महत्त्वाची भूमिका निभावली. यामध्ये प्रामुख्याने गंगापूर-खुलताबादचे आमदार प्रशांत बंब, वैजापूरचे प्रा. रमेश बोरनारे यांनी सिंहाचा वाटा उचलला. गंगापूर-खुलताबादमधून प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी संदीपान भुमरे यांना तब्बल 41 हजार 306 मतांची आघाडी मिळवून दिली. शिवसेनेच्या भुमरे यांना 94 हजार 419, तर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना 53 हजार 113 एवढी मते मिळाली. एमआयएमचे इम्तियाज जलील 48 हजार 451 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

MLA Prashant Bamb
Chhatrapati Sambhajinagar : लोकसभेला इम्तियाज जलील यांना लीड, आमदार प्रदीप जयस्वाल डेंजर झोनमध्ये...

संभाजीनगर लोकसभेची जागा भाजप लढवणार की शिवसेना? यावर खल सुरु असतांना भाजपकडून संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांची नावे समोर येत होती, त्यातील एक आमदार प्रशांत बंब यांचे होते. परंतू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आणि पदरात पाडून घेतली. भाजपच्या नाराजीचा फटका संदीपान भुमरे यांना बसेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण भाजपने आपली सगळी यंत्रणा भुमरे यांच्यासाठी कामाला लावली हे निकाल आणि त्यांना मिळालेल्या मताधिक्याने स्पष्ट झाले. त्यामुळे संभाजीनगरमध्ये महायुती अभेद्य होती हे कोणीही नाकारणार नाही.

प्रशांत बंब हे गंगापूर-खुलताबाद मतदारंसघाचे पंधरा वर्षापासून प्रतिनिधित्व करत आहेत. एक वेळा अपक्ष तर दोन वेळा भाजपकडून ते विधानसभेवर निवडून गेले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशी ओळख असलेले प्रशांत बंब यांची मतदारसंघावर चांगली पकड आहे. आक्रमक कार्यपद्धती अशी त्यांची ओळख असली तरी ते अनेकदा वादात सापडले आहेत.

MLA Prashant Bamb
Bajrang Sonawane: वडील मारतील, बायको नाश्ता देणार नाही, असे बीडचे 'बाप्पा'का म्हणाले...

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रशांत बंब यांना आपली प्रचार यंत्रणा, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अधिक मजबूत केले. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर बंब यांनी मतदारसंघात आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात आपल्या विधानसभेची चिंता नाही, आपली तयारी 2029 साठीची सुरु असल्याचे म्हटले होते. यावरून बंब यांना किती काॅन्फिडंस आहे हे स्पष्ट होते. लोकसभेच्या निवडणुकीत प्रशांत बंब यांचे नाणे खणखणीत वाजले आहे. पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना महाविकास आघाडीचे तगडे आव्हान असणार आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com