Nanded District Bank News
Nanded District Bank NewsSarkarnama

Nanded District Bank : अशोक चव्हाणांकडे ज्याचे वजन भारी तोच ठरणार बॅंकेचा कारभारी...

Congress News : बॅंकेची परिस्थिती आता सुधारली असून, गेल्या आर्थिक वर्षात बॅंकेला सुमारे ३७ कोटी २२ लाखांचा फायदा झाला.
Published on

Marathwada Political News : शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असणाऱ्या व‌ शंभर वर्षांची परंपरा असलेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सध्या बरे दिवस आले आहेत. ही बॅंक एकेकाळी आर्थिक डबघाईस आली होती. (Nanded District Bank News) तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विशेष निधी उपलब्ध करून दिल्याने बॅंकेची परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. गेल्या आर्थिक वर्षात बॅंक नफ्यात आली आहे.

Nanded District Bank News
Parbhani Loksabha Constituency : खासदार जाधवांना परभणीकर निष्ठेचे फळ देणार का ?

महाविकास आघाडीची सत्ता असलेल्या बॅंकेत माजी आमदार वसंत चव्हाण यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने नवीन अध्यक्षाची निवड येणाऱ्या रविवारी होणार आहे. (Nanded) आघाडीची सत्ता असल्याने आघाडीचा अध्यक्ष होणार हे निश्चित असून, माजी आमदार हानुमंतराव पाटील बेटमोगरेकर, (Congress) काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, बाळासाहेब रावनगावकर या तीन प्रमुख नावांची चर्चा सुरू आहे.

ऐनवेळी माजी खासदार भास्करराव पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते, असेही बोलले जाते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ज्या नावाला पसंती देतील, तोच आध्यक्ष होणार हे नक्की आहे. (Ashok Chavan) नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनेलला बहुमत मिळाले, तर याआधी बॅंकेवर महायुतीची सत्ता होती. महाविकास आघाडीच्या अंतर्गत वाटाघाटीत अध्यक्षपदाचा कार्यकाळ ठरविण्यात आला आहे.

निवडणूक झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात माजी आमदार वसंतराव चव्हाण अध्यक्ष झाले, तर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर आहेत. विद्यमान अध्यक्ष माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. हा राजीनामा संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. उपाध्यक्ष हरिहराव भोसीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे केवळ अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया होईल.

बॅंकेचे सर्वाधिक संचालक काॅंग्रेसचे १३ असून, त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच संचालक निवडून आले आहेत, तर भाजपचे दोन तर शिवसेनेचा एक संचालक निवडून आला आहे. आघाडीचे बहुमत असल्याने काॅंग्रेसचा अध्यक्ष होणार हे निश्चित असून, गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, बाळासाहेब रावनगावकर या तीन प्रमुख नावांची चर्चा आहे. ज्यांचे शिवाजीनगरात वजन भारी तोच होणार बॅंकेचा कारभारी, हे मात्र निश्चित असल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे.

Nanded District Bank News
MP Imtiaz Jaleel On Loksabha : इम्तियाज जलील हिंदू व्हाेट बॅंक फोडत खैरेंना पुन्हा धक्का देणार ?

अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेले तिन्ही संचालक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे अशोक चव्हाण कोणत्या नावाला पसंती देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या बॅंकेची २००५ मध्ये आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने बॅंक डबघाईस आली होती. ठेवीदारांना पैसे मिळणे कठीण झाले होते, बॅंकेवर निर्बंध घालण्यात आले होते. अशा कठीण परिस्थितीत अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना सुमारे शंभर कोटींची मदत राज्य शासनाकडून दिली होती. बॅंकेची परिस्थिती आता सुधारली असून, गेल्या आर्थिक वर्षात बॅंकेला सुमारे ३७ कोटी २२ लाखांचा फायदा झाला आहे.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, बाळासाहेब रावनगावकर हे भोकर विधानसभा मतदारसंघातील संचालक आहेत. अध्यक्षपद मतदारसंघातील संचालकाला देण्याचे ठरल्यास या दोन संचालकापैकी एका संचालकाला संधी मिळू शकते. एक व्यक्ती एक पद हा विचार केल्यास गोविंदराव शिंदे नागेलीकर यांच्यापुढे संकट निर्माण होऊ शकते. त्यांना जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागेल. अशावेळी अशोक चव्हाण यांना मार्ग काढावा लागणार आहे. या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com