ठाकरे सरकारने किराणा दुकानातून वाईन विकूनच दाखवावी ; एमआयएमचा इशारा

आम्ही कुठल्याही परिस्थितीत किराणा दुकान,माॅलमधून वाईन विक्री करू देणार नाही, जिथे कुठे असे प्रकार सुरु केले जातील, ती दुकाने, माॅल फुटली म्हणूनच समजा. (Mp Imtiaz Jalil)
Mp Imtiaz Jalil, Aurangabad
Mp Imtiaz Jalil, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : राज्यातील द्राक्ष उत्पादकांच्या हितासाठी माॅल, किराणा दूकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याचे ठाकरे सरकार सांगत आहे. (Mp Imtiaz Jalil) पण त्यांच्या या निर्णयावरून आता चांगलाच वाद सुरू झाला आहे. विरोधी पक्षाने आम्ही महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र होऊ देणार नाही, असे म्हणत (Uddhav Thackeray) ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली असतांनाच आता एमआयएमने (Aimim)देखील या निर्णयाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी तर ठाकरे सरकारला आव्हानच दिले आहे. तुम्ही फक्त किराणा दूकान, माॅलमधून वाईन विकूनच दाखवा, आम्ही ती फोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराच इम्तियाज जलील यांनी दिला. समाजाच्या हितासाठी कायदा हातात घ्यायची वेळ आली तरी आम्ही त्याची पर्वा करणार नाही, निदान माझ्या जिल्ह्यात तरी मी दुकानांमधून वाईन विकू देणार नाही, असेही इम्तियाज जलील यांनी ठणकावून सांगितले आहे.

एवढेच नाही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतल्याचा दावा सरकार करत असेल तर मग गांजातून देखील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल, मग त्यांना गांजाची शेती करण्याची परवानगी द्या, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. राज्या सरकारच्या वाईन विक्री निर्णयावर इम्तियाज जलील यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलतांना तिखट प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, सगळ्या वाईट गोष्टी हे तीन पक्षाचे सरकार समाजात आणू पाहत आहेत. किराणा दुकान, माॅलमधून वाईन विक्री करण्याचा निर्णय असाच तरुणांना व्यसनाकडे घेऊन जाणारा आहे. आज वाईन विक्रीला परवानगी दिली, उद्या व्हिस्की, बिअर विक्रीला परवानगी द्याल, मग तरुण दिवसाढवळ्या नशा करतील आणि सरकारनेच परवानगी दिली म्हणतील.

Mp Imtiaz Jalil, Aurangabad
आमचा अभ्यास झालेला नाही, दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकला..

आपण समाजाला कुठे घेऊन चाललो आहोत, याचा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस या तीन पक्षांनी व त्यांच्या नेत्यांनी करण्याची गरज आहे. शेतकरी द्राक्षाशिवाय इतर गोष्टींचे देखील उत्पादन करतो, त्याच्याकडे गाई, म्हशी, शेळ्या असतात. त्यांच्या दुधाचे ब्रॅन्डींग करा, सर्वसामान्यांना ते पिण्याचे आवाहन करा. पण ते सोडून तरुणांना व्यसनाकडे घेऊन जाणारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या सरकारचा हा निर्णय आहे.

आम्ही कुठल्याही परिस्थितीत किराणा दुकान,माॅलमधून वाईन विक्री करू देणार नाही, जिथे कुठे असे प्रकार सुरु केले जातील, ती दुकाने, माॅल फुटली म्हणूनच समजा, असा इशारा देखील इम्तियाज जलील यांनी दिला. माझ्या जिल्ह्यात तर मी वाईन विक्री होऊ देणार नाहीच, पण राज्यातील जनतेने देखील या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे, मग काय गुन्हे दाखल करायचे ते करा, असे आवाहन देखील त्यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com