गावकऱ्यांनीच सांगितले मोदी नावाचा गावगुंड नाही, नाना आता कोणत्या बिळात लपलात

पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या जिवाला धोका पोहोचवणं आणि महाराष्ट्रात पंतप्रधानांना मारण्याचे वक्तव्य करणं, हे मरण्या-मारण्याचे तुमच्या काँग्रेस पक्षाचेच संस्कार आहेत. (Bjp Leader Chandrakant Patil)
Nana Patole-Chandrakant Patil
Nana Patole-Chandrakant PatilSarkarnama

मुंबई ः चोर तो चोर वर शिरजोर अशी काहीशी अवस्था काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)यांच्याविषयी अत्यंत अश्लाघ्य भाषेत वक्तव्य करणाऱ्या पटोलेंनी किती खोटं रेटलं, तरी ते लपून राहणार नाही. (Bjp) आता कितीही नाटकं केली तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही.

त्यामुळे पटोलेंवर (Nana Patole) त्वरित कारवाई झालीच पाहिजे. गावकऱ्यांनीच आता स्पष्ट केले आहे, की मोदी नावाचा कुठालाही असा गावगुंड आमच्या गावात नाही, त्यामुळे नाना आता कोणत्या बिळात जाऊन लपलेत, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी केला. नाना पटोलेंवर आता सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील पाटील यांनी केली.

पत्रकार परिषदेत बोलतांना पाटील यांनी नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधान व नंतर त्याची सावरासावर करण्यासाठी केलेला बनाव याचा समाचार घेतला. मी पंतप्रधान मोदींना नाही तर गावगुंड असलेल्या मोदीविषयी बोललो होतो हा पटोलेंचा दावा देखील पाटील यांनी खोडून काढला.

पाटील म्हणाले, खुद्द सुकळी गावाच्या ग्रामस्थांनीच हा दावा केला आहे की, मोदी नावाचा कोणताही गावगुंड आमच्या गावात नाही. राज्याा प्रदेशाध्यक्ष असताना इतक्या खालच्या पातळीवर जाऊन मोदींजींना मारण्याची भाषा करायची आणि अंगाशी आल्यावर सारवासारव करून बिळात लपायचं, हेच तुम्ही करू शकता.गावगुंडं नेमकं कोण आहे, हे संपूर्ण गावाला माहीत आहे.

Nana Patole-Chandrakant Patil
घरातल्याच कच्च्या-बच्च्यांना स्वप्न दाखवणारे क्षीरसागर मुस्लिम नगराध्यक्ष करतील का?

त्यामुळे उगाच गावकऱ्यांची बदनामी करून स्वतःच्या चेहऱ्यावर पसरलेला खोटेपणा आता बाजूला सारून घ्या. कितीही पळवाटा काढण्याचं ठरवलं तरी तुम्हाला तुमच्या कुकर्मांची फळं आता भोगावीच लागतील. पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या जिवाला धोका पोहोचवणं आणि महाराष्ट्रात पंतप्रधानांना मारण्याचे वक्तव्य करणं, हे मरण्या-मारण्याचे तुमच्या काँग्रेस पक्षाचेच संस्कार आहेत.

नाना पटोले यांचा इतिहास वाद निर्माण करणारे नेते असा आहे. त्यांच्या नेत्यांकडून त्यांनी गुण घेतले आहेत. नेत्यांच्या आई मात्र शांत असतात, असा टोला देखील पाटील यांनी सोनिया गांधी यांचे नाव न घेता लगावला. नौटंकी करण्यात मोदी हुशार आहेत असे विधान नाना पटोले यांनी ते पंजाबमध्ये मोदींचा रस्तारोको केला तेव्हा केले होते.

काल भंडारा येथे ते पुन्हा बोले मोदींना शिव्या घालू शकतो. मारू शकतो आणि यावर काॅंग्रेसचा एकही नेता बोलायला तयार नाही. आम्ही या विरोधात रस्त्यावर उतरलो आहोत. आमचे नेते राज्यभर आंदोलन करत आहेत. मात्र आमच्या तक्रारी देखील पोलिस ऐकून घेत नाही. गावोगावी पोलिस प्रशासन आम्हांला हैरान करत आहेत. पण आम्ही नानांच्या विरोधात कोर्टात जाऊ, राज्यपालांकडे देखील तक्रार करू, असेही पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com