घरातल्याच कच्च्या-बच्च्यांना स्वप्न दाखवणारे क्षीरसागर मुस्लिम नगराध्यक्ष करतील का?

निवडणुका जवळ आल्या आहेत व आपल्याला या निवडणुका सोप्या जाणार नाहीत हे त्यांच्या लक्षात आल्याने वाटेल ते ढोंग करण्यात क्षीरसागर मश्गुल आहेत. (Beed Municipal Council)
Kolangade-yogesh-Bharatbhushn Kshirsagar
Kolangade-yogesh-Bharatbhushn KshirsagarSarkarnama

बीड : डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी ऐन नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपून प्रशासकांची नेमणूक होण्याच्या दिवशी नगर पालिकेच्या प्रवेशद्वारात उर्दू भाषेचा फलक लावला. (Beed Municipal Council) सत्ता असताना त्यांना शहाणपण का सुचले नाही, मुस्लिम समाज, उर्दू भाषेबाबत आतापर्यंत त्यांना एलर्जी होती का? (Shivsangram) असा सवाल करत मुस्लिम बांधवांविषयी खरेच प्रेम असेल तर क्षीरसागरांनी मुस्लिम समाजास नगराध्यक्षपद देणार का, हे जाहीर करावे, असे आव्हान शिवसंग्रामच्या भारतीय संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांनी दिले आहे.(Marathwada)

घरच्याच कच्चा - बच्चांना नगराध्यक्षपदाचे स्वप्न दाखवायचे आणि मुस्लिम समाजा विषयी बेगडी प्रेम दाखवायचे हा प्रकार बीडकरांच्या लक्षात आल्याचा टोलाही त्यांनी लगवला. नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसंग्रामच्या कोलंगडे यांनी टाकलेल्या गुगलीला आता क्षीरसागर कसे टोलावणार हे पहावे लागेल.

सर्वाधिक काळ नगर पालिका ताब्यात ठेवण्याचा आणि नगराध्यक्ष राहण्याचा विक्रम करणाऱ्या डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मागच्याच निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्षांच्या निवडीवेळी ही शेवटची निवडणुक असे जाहीर केले होते. आताच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुत्र डॉ. योगेश क्षीरसागर यांचे लॉन्चिग सुरु केले आहे.

सध्या निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांचे उद॒घाटने, लोकार्पण कार्यक्रमांतून क्षीरसागर काका - पुतण्यांचे एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप सुरु असताना आता शिवसंग्रामनेही यात उडी घेतली आहे. बीड शहरात सामाजिक रचनेत मुस्लिम समाजाची लोकसंख्या आणि मतदान निर्णायक आहे.

दरम्यान, नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपून पालिकेवर प्रशासकाची नेमणूक होण्याच्या तोंडावर डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते नगर पालिकेवर उर्दू भाषेचा फलक लावण्यात आला. त्यावर प्रभाकर कोलंगडे म्हणाले, एवढ्या वर्षांत मुस्लिम समाजाचे कोणते उद्योग - व्यवसाय, नोकरी व अन्य प्रश्न मार्गी लावण्यासाठी क्षीरसागर कुटुंबीयांनी प्रयत्न केले ते सांगावे.

Kolangade-yogesh-Bharatbhushn Kshirsagar
मोदी नावाचा गावगुंड कोण? पटोलेंनी त्याला समोर आणावे; भाजपचे आव्हान...

मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत साधे अवाक्षरही त्यांनी आत्तापर्यंत काढले नाही. मुस्लिमांना आरक्षण मिळावे किंवा नाही याबाबतही कधी चर्चा केली नाही. आता निवडणुका जवळ आल्या आहेत व आपल्याला या निवडणुका सोप्या जाणार नाहीत हे त्यांच्या लक्षात आल्याने वाटेल ते ढोंग करण्यात क्षीरसागर मश्गुल आहेत.

असल्या उथळ प्रेमाला बीड शहरातील मुस्लिम समाज कधीही भीक घालणार नाही. मुस्लिम समाजानेही त्यांना जाब विचारावा, असे आवाहन करुन येत्या काळात दुर्दैवाने क्षीरसागरांना नगरपालिकेची सत्ता मिळाली तर मुस्लिम समाजास नगराध्यक्षपद देणार का, हे त्यांनी अगोदर जाहीर करावे, असे आव्हानही कोलंगडे यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com