औरंगाबाद महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा, तरी भावी नगरसेवक `गॅस`वरच..

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाकडे राजकीय पक्षांबरोबच औरंगाबादकरांचे देखील लक्ष लागले होते. (Aurangabad)
Aurangabad Municipal Corporation
Aurangabad Municipal CorporationSarkarnama

औरंगाबाद : महानगर पालिकेच्या प्रभाग रचनेविषयीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज निकाली काढली. त्यामुळे महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. (Aurangabad) तर दुसरीकडे ओबीसींच्या राजकीय आरक्षणा संदर्भातील राज्य सरकारने न्यायालयात दाखल केलेला अहवाल फेटाळण्यात आला. (Municipal Corporation) त्यामुळे सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांनी देखील ओबीसा आरक्षणाशिवाय कुठल्याच निवडणुका घ्यायच्या नाहीत, अशी भूमिका घेतली आहे.(Marathwada)

त्यामुळे आधीच दोन -अडीच वर्ष कोरोना आणि सर्वोच्च न्यायालयातील याचिकेमुळे लांबणीवर पडलेली महापालिका निवडणुक पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भावी नगरसेवक पुन्हा एकदा गॅसवर गेले आहेत. औरंगाबाद महापालिकेच्या प्रभाग प्रारुप रचनेच्या विरोधात नागरिकांकडून मोठ्य प्रमाणात आक्षेप नोंदवण्यात आले होते. या प्रभाग रचनेविरोधात समीर राजूरकर व इतरांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.

परंतु खंडपीठाने ती फेटाळल्यानंतर राजूरकर व इतरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर राज्य निवडणूक आयोगाला नव्याने प्रभाग रचना करण्याचे व त्यात पारदर्शकता राखण्याचे निर्देश देत ही याचिका निकाली काढण्यात आली. त्यामुळे येत्या एप्रिल-मे मध्ये महापालिकेच्या निवडणुका होतील, असे गृहित धरले जात होते.

त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाकडे राजकीय पक्षांबरोबच औरंगाबादकरांचे देखील लक्ष लागले होते. याचिका निकाली निघाली असली तरी ओबीसी राजकीय आरक्षणासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेला अहवाल फेटाळण्यात आला आहे.

Aurangabad Municipal Corporation
Parbhani : शेतात सापडलेला साप महसूल अधिकाऱ्याकडे देत दिवसा वीजेची केली मागणी

त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य कुठल्याच निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर विरोधी पक्षांनी देखील हीच भूमिका घेतली. त्यामुळे प्रभाग रचनेसंदर्भातील याचिका निकाली निघाली असली तरी महापालिका निवडणुकीसाठी अजून वाट पहावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com