Parbhani : शेतात सापडलेला साप महसूल अधिकाऱ्याकडे देत दिवसा वीजेची केली मागणी

रात्रीच्या अंधारात कामे करावी लागत असल्याने शेतकऱ्यांना अनंत अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे आमची मागणी आहे की शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा. (Parbhani District)
Swabhimani Shetkari Sanghtna, Parbhani
Swabhimani Shetkari Sanghtna, ParbhaniSarkarnama

परभणी : शेतीला दिवसा विज पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गुरुवारी (ता.तीन) जिल्हाधिकारी कार्यालयात अनोखे आंदोलन करण्यात आले. (Parbhani) शेतात सापडलेला विषारी नाग जातीचा साप पकडून थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.(Farmer)

शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा व इतर मागण्यांसाठी खासदार राजू शेट्टी यांनी गेल्या आठ दिवसापासून धरणे आंदोलन सुरु केले आहे. (Swabhimani Shetkari Sanghtana) शेतीला रात्री वीज पुरवठा करण्यात येतो, त्यामुळे शेतीची कामे शेतकऱ्यांना रात्री करावे लागतात. रात्रीच्या अंधारात वन्यजीव संचार करत असतात. आशा परिस्थितीत जीव धोक्यात घालून शेतकरी पिकांची जोपासना करतो.

रात्री शेतीची कामे करतांना सर्पदंश, रानडुकरांचा हल्ला, विंचू चावणे व इतर प्राण्याकडून जीवघेणे हल्ले होऊन शेतकरी जखमी होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही प्रसंगी शेतकऱ्यांना अशा प्रकारांमुळे जीव देखील गमवावा लागल्याचे उदाहरणं समोर आलेली आहेत.

परंतु, या पैकी जे वन्यजीव हे कायद्याने संरक्षित केलेले आहेत, त्या वन्यजीवांना जर काही इजा केली तर आपल्यावरच गुन्हा नोंद करण्यात येत असतो. त्यामुळे काल रात्री शेंद्रा या गावातील शेतकऱ्यांना शेतीत काम करतांना आढळलेला विषारी साप पकडून ठेवला. हा साप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आला. तेथील महसुल अधिकाऱ्यांना हा साप सुपूर्द करून शेतीला दिवसा वीज द्या, अशी मागणी करत शेतकरी संघटनेने आंदोलन केले.

Swabhimani Shetkari Sanghtna, Parbhani
नवाब मलिकांना दिलासा नाहीच; 7 मार्चपर्यंत कोठडी

रात्री- अपरात्री शेतकरी शेतात काम करत आहेत. दिवसा विज पुरवठा राहिल्यास दिवसा कामे आटोपता येतात. परंतू रात्रीच्या अंधारात कामे करावी लागत असल्याने शेतकऱ्यांना अनंत अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे आमची मागणी आहे की शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा, असे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com