Harshvardhan Jadhav On MP Karad : कराडांना लोकसभा लढवायची म्हणजे, जिल्हाधिकाऱ्याने मला तलाठी करा म्हणण्यासारखे...

BJP News : भाजपकडून कराडांना उमेदवारी दिली जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
Harshvardhan Jadahv-Dr. Bhagwat karad News
Harshvardhan Jadahv-Dr. Bhagwat karad NewsSarkarnama

Marathwada Political News : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून आपण दोनशे टक्के लढणारच, अशी घोषणा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. (BJP Politics News) ही घोषणा करत असतानाच त्यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांना टोला लगावला.

Harshvardhan Jadahv-Dr. Bhagwat karad News
Chhatrapati Sambhajinagar Ganesh Festival : गणरायासाठी सगळे राजकीय नेते एकत्र...

केंद्रामध्ये मंत्री असताना कराडांना (Dr.Bhagwat Karad) संभाजीनगरातून लोकसभा का लढवायची आहे? हे म्हणजे जिल्हाधिकाऱ्याने मला तलाठी करा, असे म्हणण्यासारखे आहे. अडीच-तीन वर्षांपासून तुम्ही केंद्रात राज्य अर्थमंत्री आहात, शहरासाठी, जिल्ह्यासाठी काय आणले? काय दिवे लावलेत? हे एकदा सांगा, अशा शब्दांत जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी कराडांवर टीका केली.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास डाॅ. कराड इच्छुक आहेत. शिवसेना-भाजप युतीमध्ये या जागेवर शिंदे गटाने दावा सांगितला आहे. (Marthwada) मात्र, भाजपकडून कराडांना उमेदवारी दिली जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. स्वतः कराड यांनीदेखील लोकसभा लढवण्याची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे.

तर तिकडे शिंदे गटाकडून संदीपान भुमरे, संजय शिरसाट हे दंड थोपटून आहेत. यात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या पराभवाला कारणीभूत ठरलेले अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव दुसऱ्यांदा रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. गेल्यावेळी जाधव यांनी २ लाख ८३ हजार मते मिळवली होती.

पण त्यांच्यामुळे इम्तियाज जलील निवडून आल्याचा ठपका ठेवला गेला. याचा फटका जाधव यांनी विधानसभा निवडणुकीतही बसला आणि त्यांचा पराभव झाला. आता कराडांनी लोकसभा लढवण्याची तयारी सुरू केल्यामुळे जाधव यांनी त्यांच्यावर टीका सुरू केली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com