एक वेळ असा होता की, आपल्या पक्षात कोणी थांबत नव्हतं

(Central State Railway Minister)रावसाहेब दानवे हे मागे शेतकऱ्यांना (Raosaheb Danve) 'साले' बोलले होते. हे विधान घराघरात पोचवा
Ncp Leader Jayant Patil
Ncp Leader Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

भोकरदन ः "मोदी सरकारने परदेशातून तेल आयात केल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळेनासा झाला आहे. मुळात भाजप नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात राहिला आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे मागे शेतकऱ्यांना 'साले' बोलले होते. हे विधान घराघरात पोचवा", असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त जालना जिल्ह्यातील भोकरदन विधानसभा मतदारसंघात ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. "एक वेळ असा होता की, आपल्या पक्षात कोणी थांबत नव्हतं, लोकं पक्ष सोडून जात होते. आज मात्र त्यांना पश्चाताप होतोय की राष्ट्रवादीत थांबायला हवं होतं. आपण पडत्या काळात पक्षासोबत होतात, आजही आहात, याबद्दल भोकरदनवासियांना त्यांनी धन्यवादही दिले.

जंयत पाटील म्हणाले, २०२४ ला आपल्या अंगावर गुलाल पाडायचा असेल तर पक्षाचा विस्तार करा. जे पक्ष सोडून गेले आहेत आणि पुन्हा परत येऊ इच्छितात अशांना सोबत घ्या, त्यांचे कुणी पक्ष सोडत असतील तर त्यांना आपल्या पक्षात घ्या. निवडणुकीच्या मतमोजणीचा दिवस डोक्यात ठेवून काम करा.

राज्यात आणि दिल्लीत भाजपची सत्ता असल्याने डोक्यावरील सुर्य कधी मावळणार नाही, अशा भ्रमात भाजप होती. परंतु तो सुर्य मावळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भोकरदन येथील संघटना ही प्रचंड लढवय्यी आहे, समोरच्या बाजूला मोठी ताकद असतानाही त्याच तोडीची झुंज राष्ट्रवादी इथे देत आहे. इथला प्रत्येक कार्यकर्ता हा संघर्ष करणारा आहे, अशी शाब्बासकी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या भाषणात दिली.

माजी आमदार चंद्रकांत दानवे इथे प्रत्येक गोष्टीसाठी पाठपुरावा करतात. रस्ते, वीज, पाणी या सर्व गोष्टींवर याबाबत मागणी करत असतात. आपला स्वतःचा आमदार नसल्याने काही प्रमाणात अडचण येते. मात्र या भागाचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडीचा संपूर्ण पाठिंबा आहे, असेही टोपे यांनी सांगितले.

Ncp Leader Jayant Patil
आमदार सोळंकेंसाठी प्रदेशाध्यक्षांनी नियोजित दौराच बदलला..

जालना जिल्ह्याचा विकास करण्यासाठी संपूर्ण शासन काम करत आहे. आज कोविडची परिस्थिती आहे, त्यामुळे या भागाला नव्या कोऱ्या रुग्णवाहिका दिल्या. मी जालनावासियांसोबत उभा होतो, आजही उभा आहे आणि उद्याही राहील, असे आश्वासनही राजेश टोपे यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com