Kailas Patil Statement: ''धाराशिवमधला हा आमचा शेवटचा पराभव आणि त्याचा वचपा...''; कैलास पाटलांनी दंड थोपटलं

Dharashiv Market Commitee Election 2023: धाराशिवमधला पराभव आमदार कैलास पाटलांच्या चांगलाच जिव्हारी....
Kailas Patil Statement, Dharashiv Market Commitee Election 2023
Kailas Patil Statement, Dharashiv Market Commitee Election 2023Sarkarnama

Dharashiv News: धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुती व महाविकास आघाडीनं पूर्ण ताकद पणाला लावली. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती.

यात अखेर भाजपा आमदार राणाजगजितिसंह पाटील यांच्या नेतृत्वातील भाजप-शिवसेना शेतकरी विकास पॅनलने महाविकास आघाडीला पराभवाची धूळ चारली. यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील(Kailas Patil) यांनी बाजार समितीतील पराभवाचा वचपा पंचायत समितीच्य निवडणुकीत काढणार असल्याचा दावा केला आहे.

Kailas Patil Statement, Dharashiv Market Commitee Election 2023
Rahul Gandhi News: राहुल गांधींचा थेट सुप्रिया सुळेंना फोन; राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर काय म्हणाले?

भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व शिवसेनेच्या शेतकरी विकास पॅनलने धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ पैकी १७ जागा जिंकत महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का दिला. व्यापारी मतदार संघातून महाविकास आघाडीची केवळ एक जागा निवडून आली आहे. हा पराभव आमदार कैलास पाटलांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

धाराशिव(Dharashiv) कृषी उत्पन्न बाजार समितीवर यापूर्वी भाजपाचीच सत्ता होती. ही सत्ता काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीनं मागील काही दिवसांपासून कंबर कसली होती. शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्यासह काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मतमोजणी पूर्वीपर्यंत आघा़डी आणि युती यांच्याकडून विजयाचा दावा करण्यात येत होता.पण यात युतीनं बाजी मारली.

Kailas Patil Statement, Dharashiv Market Commitee Election 2023
Maharashtra politics : मुख्यमंत्री होणे हेच अजितदादांचे अंतिम ध्येय ; सुळेंना नेतृत्व मिळाले तर वडिलांची उंची गाठण्यासाठी..

ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी धाराशिव बाजार समितीतील महाविकास आघाडीच्या पराभवावर भाष्य करतानाच भाजपा शिवसेना युतीला जाहीर इशारा दिला आहे. आमदार पाटील म्हणाले, धाराशिव बाजार समितीच्या निवडणुकीत आम्हांला तीनपैकी दोन बूथवर चांगली मतं पडली. फक्त एका बूथवर आम्ही मागे पडलो. याचं आम्ही नक्की आत्मपरीक्षण करणार आहोत.

पण धाराशिवचा पराभव हा आमचा शेवटचा पराभव असेल. आणि या पराभवाचा वचपा आम्ही आगामी पंचायत व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये काढणार आहोत असा इशाराही पाटील यांनी भाजपा शिवसेना युतीला दिला आहे.

Kailas Patil Statement, Dharashiv Market Commitee Election 2023
Karnataka Election : राऊतांनी मराठी भाषिकांचा मुद्दा तापवला, फडणवीसांच्या सभेत एकीकरण समिती दाखवणार 'काळे झेंडे'

दुसरीकडे शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश सोमाणी यांचा दारून पराभव झाला. यानंतर सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण), सेवा सहकारी संस्था (महिला), सेवा सहकारी संस्था (ओबीसी), सेवा सहकारी संस्था (भविजा), ग्रामपंचायत (सर्वसाधारण), ग्रामपंचायत (अनु. जाती व जमाती), ग्रामपंचायत (आर्थकदृष्ट्या दुर्बल) आणि हमाल मापाडी मतदारसंघातून महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला भोपळाही फोडता आला नाही.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com