सत्तेतील लोकांनी केलेला इतिहासातील हा सर्वात मोठा उठाव ; पद ,पैशासाठी नाही..

उद्धव ठाकरेंनी आमच्या तक्रारी ऐकून घेतल्या असत्या, त्या सोडवल्या असत्या तर हे घडले नसते. पण त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच आम्हाला हा मार्ग स्वीकारावा लागला. ( Ex. Minister Sandipan Bhumre)
Ex. Minister Sandipan Bhumre
Ex. Minister Sandipan BhumreSarkarnama

औरंगाबाद : मतदारसंघातील विकास कामे ठप्प झाली होती, पदाधिकारी, लोकांची कामे होत नसल्याने सत्ता आणि मुख्यमंत्रीपद असून देखील आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. ती वेळोवेळी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकले नाही. एकनाथ शिंदे यांनी पाचवेळा उद्धव ठाकरेंना भेटून आमदारांच्या नाराजी कल्पना दिली होती. पण त्याकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम आहे.

माझ्यासह गुलाबराव पाटील, दादा भुसे व इतर कॅबिनेट मंत्री होते, यापेक्षा आम्हाला आणखी मोठ काय मिळणार आहे? पण तरीही आम्ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. (Marathwada) आतापर्यंत विरोधकांमधून बंड होतांना अनेकदा पाहिले, पण मंत्री, सत्ता असलेल्या पक्षातून एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला हा उठाव जगातील इतिहासातला पहिला उठाव असेल, अशी प्रतिक्रिया माजीमंत्री संदीपान भुमरे यांनी दिली.

बंडखोरी आणि त्यानंतर घडलेल्या सत्ता संघर्षानंतर भुमरे दोन आठवड्यानंतर जिल्ह्यात काल परतले. तत्पुर्वी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना मंत्री, सत्ता असतांना बंड का केले? यासह संपुर्ण घटनाक्रमावर भाष्य केले. आम्ही केलेले बंड नाही, तर उठाव होता, असा दावा देखील त्यांनी केला. भुमरे म्हणाले, आमच्यावर पैसा, सत्तेसाठी गद्दारी केल्याचे आरोप केले गेले, पण त्यात कुठलेही तथ्य नाही. पैशाचे म्हणाल तर आमच्यापैकी अनेक आमदार हे घरचे चांगले आहेत, त्यामुळे पैशासाठी कोणी बंड केले असे म्हणत असेल तर ते साफ चुकीचे आहे.

Ex. Minister Sandipan Bhumre
Hingoli : बांगरांच्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेचा हिंगोलीतील नवा `सरदार` कोण?

पद, पैशाच्या लालसेने कुणीही गेले नाही, तर केवळ मतदारसंघातील कामे होत नाही, सत्तेतील अडीच-तीन वर्ष गेली दोन वर्षांनी पुन्हा निवडणुकाली सामोरे जातांना मतदारांना काय सांगणार या विवंचनेतून हे सगळं घडलं. २५ कोटी ५० कोटी या निव्वळ अफवा आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरुवातीला आम्ही मंत्री आणि काही अपक्ष होतो, नंतर ही संख्या वाढत जाऊन ५० वर पोहचली. हे नाराजी असल्याशिवाय कसे घडू शकते.

उद्धव ठाकरेंनी आमच्या तक्रारी ऐकून घेतल्या असत्या, त्या सोडवल्या असत्या तर हे घडले नसते. पण त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच आम्हाला हा मार्ग स्वीकारावा लागला. सत्ता आणि मंत्रीपद धोक्यात घालून कुणी उठाव करत असंत का? पण जेव्हा कुणी ऐकून घेत नसेल, त्यावर मार्ग काढत नसेल तर दुसरा पर्याय उरत नाही. उदयसिंह राजपूत यांनी माझ्याकडे दोन गाड्या भरून पैसे घेऊन आल्याचा दावा केला, तो खोटा आहे. त्यांनी याबद्दल सविस्तर माहिती द्यायला हवी होती, असेही भुमरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com