Vinayak Mete अपघात : गाडीचालक कदमची कसून चौकशी करा, तो सारखा स्टेटमेंट बदलतोय!

याला घात म्हणायचे की अपघात? सरकारने देखील अपघाताच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली पण त्यांच्या तपासातून देखील अजून काहीच समोर आलेले नाही. (Vinayak Mete)
Vinayak Mete Relatives New, Pune
Vinayak Mete Relatives New, PuneSarkarnama
Published on
Updated on

पुणे : शिवसंग्रमाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर आता संशयाचे जाळे अधिक घट्ट होत चालले आहे. (Beed) बीडहून पुण्याला जातांना मुंबईजवळ पहाटे (Vinayak Mete) विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. यात मेटे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबतचा सुरक्षा रक्षक व चालक हे किरकोळ जखमी झाले होते. Pune-Mumbai Expressway अपघात स्थळावरील परिस्थिती आणि गाडीचालक एकनाथ कदम याच्या पोलिसांना दिलेल्या जबाबातील तफावत यामुळे मेटे यांच्या गाडीला नेमका अपघात झाला की मग हा घात आहे, असा आरोप मेटे यांच्या कुटुंबियांकडून केला जात आहे.

आज पुण्यात मेटे यांचे भाचे आणि पुतणे यांनी पत्रकार परिषद घेत या अपघाताची चौकशी आणि त्याचा तपशील आम्हाला द्यावा, तसेच वारंवार स्टेटमेंट बदलणाऱ्या गाडीचालक एकनाथ कदम याची कसून चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. (Marathwada) विनायक मेटे यांचा दुर्दैवी अपघात व त्यात त्यांचे झालेले निधन राज्याला चटका देऊन जाणारे ठरले. मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारा लढवय्या नेता हरपला अशा प्रतिक्रिया सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केल्या होत्या.

मेटे यांच्या कारला झालेला अपघात सुरुवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मेटे यांच्या कुटुंबियांनी दशील या अपघाताबद्दल काही प्रश्न आणि शंका उपस्थितीत केल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मेटे कुटुंबिय आणि समर्थकांची मागणी लक्षात घेऊन या अपघाताच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली. मेटें यांच्या पार्थिवावर बीडमध्ये अंत्यसंस्कार झाल्यानंतर पोलिस व एसआयटीच्या तपासाला वेग आला आहे.

दरम्यान, मेटे यांच्या गाडीचा चालक एकनाथ कदम हा वारंवार आपला जबाब बदलत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पुण्यात मेटे यांचे पुतणे व भाचे यांनी पत्रकार परिषद घेऊन गाडी चालकाची कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे. अपघात झाल्यानंतर मला फोन आले. साहेबांचे तीन ड्रायव्हर आहेत, हे मला माहित नव्हते असा दावा त्यांनी केला आहे. साहेबांची गाडी एकनाथ कदम हा ड्रायव्हर चालवत होता हे कळाल्यावर मी त्यांना फोन केला, लोकेशन विचारले.

Vinayak Mete Relatives New, Pune
Assembly Session : शिरसाट, शेलारांच्या मंत्रीपदासाठी मुंडेची घोषणाबाजी..

पण लोकशन न सांगता तोच मला तुम्ही कोण बोलतायं असं विचारत होता. लोकेशन न सांगता तो फक्त रडत होता. तेव्हा तिथे उपस्थीत एका दुसऱ्याच व्यक्तीने मला घटनास्थळीअँब्युलन्स आल्याचे सांगितले होते. त्याच व्यक्तीने मला सांगितले की ड्रायव्हरला काही झालेले नाही, पोलिस जखमी आहेत पण साहेब जागेवरच गेले आहेत. साहेबांच्या पायाला, डोकं लागलं आहे, असे नंतर ड्रायव्हरने मला सांगितले. हा ड्रायव्हर रोज सातत्याने स्टेटमेंट बदलत आहे, त्यामुळे आम्हाला अनेक प्रश्न पडले आहेत.

याला घात म्हणायचे की अपघात? सरकारने देखील अपघाताच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली पण त्यांच्या तपासातून देखील अजून काहीच समोर आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या चौकशीत नेमकं काय आढळलं हे देखील आम्हाला कळायला हवं. आमच्यासाठी हा अपघात मोठा आघात होता, त्या दुःखातून आम्ही अजूनही सावरलेलो नाही.

चालकाच्या चुकीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ड्रायव्हर सतत कोणाला फोन करत होता हे देखील समोर आले पाहिजे, त्याचे काॅल डिटेल्स आम्हाला हवे आहेत. त्याने अपघातानंतर लोकशन का सांगितले नाही, लपवून का ठेवले आमच्यापासून हे देखील समजले पाहिजे, अशी मागणीही मेटेंच्या पुतण्या आणि भाच्याने पत्रकार परिषदेत केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com