Gram Panchayat Election : ‘तुमच्यामुळे माझा मुलगा सरपंच झाला नाही’ : पराभवाच्या रागातून कुटुंबाला जीवे मारण्यासाठी दिली सुपारी

औटे यांच्या कुटुंबीयांना संपविण्यासाठी पाच लाखांची सुपारी दिल्याचे त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
Gram panchayat News
Gram panchayat NewsSarkarnama

आष्टी (जि. बीड) : ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणुकीचा (Election) धुरळा खाली बसला असला तर त्यामुळे गावांतील दोन गटांत निर्माण झालेले राजकीय शत्रूत्व कमी व्हायला तयार नाही. अनेक ठिकाणी मारहणीच्या घटना घडल्या आहेत, तर अनेक ठिकाणी हल्याचे प्रकार घडले आहेत. असा एक प्रकार बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात घडला आहे. तुमच्यामुळे माझा मुलगा सरपंच झाला नाही, असा उल्लेख करत जीवे मारण्याची धमकी एका उसतोड मुकादमला आली आहे. (Threatened to kill a person out of anger over defeat in Gram Panchayat elections)

आष्टी तालुक्यातील नांदा ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झाल्याचा राग मनात धरून नगर येथील पोस्टातून ऊसतोड मुकादमच्या कुटुंबाला आलेल्या धमकीच्या या पत्राने खळबळ उडाली आहे. पत्रात कुटुंबाला जिवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचाही उल्लेख करण्यात आलेला आहे.

Gram panchayat News
Terna Sugar Factory : तानाजी सावंतांची अमित देशमुखांना धोबीपछाड : ‘तेरणा’चा ताबा अखेर भैरवनाथ शुगरकडे!

दत्तात्रय गहिनीनाथ औटे हे आष्टी तालुक्यातील नांदा येथील रहिवासी असून, ऊसतोड मुकादम म्हणून काम करत आहेत. गेल्या शुक्रवारी (ता. ३० डिसेंबर) नगर येथील पोस्टातून त्यांना एक पाकीट मिळाले आहे. पाकिटातील निनावी मजकुरात दत्तात्रय औटे यांच्यासह त्यांचे आई-वडील यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे आढळून आले आहे.

Gram panchayat News
BJP News : राष्ट्रवादीतून आलेल्या आक्रमक महिला नेत्याला भाजपने दिले राज्याचे पद!

औटे यांच्या कुटुंबीयांना संपविण्यासाठी पाच लाखांची सुपारी दिल्याचे त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत तुमच्यामुळे माझा मुलगा सरपंच झाला नाही, असा उल्लेख या पत्रात आहे. या पत्राने औटे कुटुंब भयभीत झाले आहे. या प्रकरणी दत्तात्रय गहिनीनाथ औटे यांनी आष्टी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी (ता. १ जानेवारी) रात्री संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com