Chhatrapati Sambhajinagar: कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघातील भीषण वास्तव; आठवड्याभरात तीन शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनत चालला आहे.
Abdul Sattar
Abdul Sattar Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmer Suicide) दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. धक्कादायक म्हणजे राज्याचे कृषीमंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांच्याच औरंगाबादमध्ये एकाच आठवड्यात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सोयगाव तालुक्यातील पळसखेडा गावातील २५ वर्षीय तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून जीवन संपवलं आहे. सुरज उदयसिंग सेवगन ( वय 25 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सूरज यांच्याकडे पळसखेडा पाच एकर शेती आहे. शेतीसाठी त्यांनी बॅंकेकडून कर्ज घेतले होते. पण सततच्या नापीकीमुळे कर्ज फेडण्यात अडचणी येत होत्या. या चिंतेंतून सूरज यांनी विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवले. या प्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Abdul Sattar
Beed Politics: मुंडे बहिण-भावात रंगली श्रेयवादाची लढाई; वाचा, नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, गेल्याच आठवड्यात सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील अंधारी गावातून एकापाठोपाठ दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडल्या होत्या. भागिनाथ बाळूबा पांडव (वय - ४६ वर्षे), जनार्दन सुपडू तायडे (वय - ५५ वर्षे) या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. याघटनेला काही दिवस उलटत नाहीत तर र गंगापूर तालुक्यातील वाहेगावचे भिका शिरसाट यांनीदेखील गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्यानंतर कर्जबाजारीपणास कंटाळून खुलताबाद तालुक्यातील शंकर अंबादास गायकवाड (वय 35 वर्षे) आणि वैजापूर तालुक्यातील बेंदवाडी येथील राजूसिंग लालसिंग बेडवाळ (वय 40 वर्षे) यांनी आत्महत्या केल्या. या घटना ताज्या असतानाच आता पळसखेडातील सुरज सेवगन ( वय 25 वर्षे) या तरुणाने आत्महत्या केल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

एकीकडे कृषीमंत्र्यांच्या तालुक्यात शेतकरी आत्महत्या करत असताना दुसरीकडे सत्तार यांच्या सोयगाव तालुक्याला अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीतून वगळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अवकाळी पावसाने सोयगाव तालुक्यात शून्य टक्के नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवल्याने एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबाद सह राज्यात ठिकठिकाणी झालेल्य अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतानाही नुकसान झालचं नसल्याचा अहवाल पाठवल्याने शेतकरी संतप्त झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com