Devendra Fadnavis News : '' मेटेंची मराठा आरक्षण आणि शिवस्मारक ही स्वप्नं पूर्ण करण्यासाठी...''; फडणवीसांची ग्वाही

Shivsangram Political News : '' आमदारकीच्या पाच दिवस अगोदरपर्यंत रंगकाम करणाऱ्या विनायकरावांनी संघर्षाने आपली उंची गाठली..''
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis News Sarkarnama
Published on
Updated on

Beed : ज्यावेळी कॅबिनेट मंत्रिपदाबाबत अडचण निर्माण झाली, त्यावेळी दिवंगत विनायकराव मेटेंनी मंत्रिपदापेक्षा आपण सोबत असणं महत्वाचं आहे अशी भूमिका स्पष्ट केली. हा त्यांचा दिलदारपणा होता. आरक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या मेटेंचं निधन देखील आरक्षण बैठकीला जातानाच झाले. मात्र, आता मराठा आरक्षण व शिवस्मारक ही त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी शिवसंग्राम आणि डॉ. ज्योती मेटे यांच्या पाठीशी खंबीर उभा राहणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दिवंगत लोकनेते विनायक मेटे(Vinayak Mete) यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि. ३०) अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, शिवस्मारक उभारल्यानंतर अनेक वर्षे समितीच्या अध्यक्षाचे नाव राहणार असल्याने समितीच्या अध्यक्षपदाबाबत अनेकजण इच्छुक होते. त्यावेळी दिवंगत मेटे म्हणाले, अध्यक्ष कोणालाही करा परंतु त्याने इंटरेस्टने काम करावे. मात्र, मी त्यांना म्हणालो, तुम्हीच शिवस्मारकाचे काम श्रद्धेने करु शकता म्हणून तुम्हालाच अध्यक्षपद द्यायचे ठरवले आहे अशा शब्दांत फडणवीसांनी मेटेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

Devendra Fadnavis News
Pankaja Munde on Maratha Reservation: '...तोपर्यंत फेटा बांधणार नाही'; पंकजा मुंडेंचा एल्गार

या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. ज्योती मेटे, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, आमदार प्रविण दरेकर,शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, आमदार भारती लव्हेकर, आमदार नमिता मुंदडा आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, विनायक मेटेंचा मराठा आरक्षण(Maratha Reservation) व शिवस्मारक हा श्वास होता. त्यांना नेतृत्वापेक्षा चळवळ महत्वाची वाटायची. आरक्षणाच्या लढ्यात कायम अग्रभागी विनायकराव न्यायालयीन लढ्यात देखील स्वत:चा वकील लावून तारखांना हजर राहत. पण आता त्यांची मराठा आरक्षण आणि शिवस्मारक हे त्यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी शिवसंग्राम आणि डॉ. ज्योती मेटे यांच्या पाठीशी खंबीर उभा राहणार आहे.

विनायकराव म्हणत तुम्हीच समाजाला आरक्षण देऊ शकतात. समाजातील विद्यार्थी शिकावा, हाताला काम मिळाले तरच समाज पुढे जाईल असे ते म्हणत. गरीब मराठा समाजासाठी त्यांची कायम तळमळ होती. आमदारकीच्या पाच दिवस अगोदरपर्यंत रंगकाम करणाऱ्या विनायरावांनी संघर्षाने आपली उंची गाठली. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख सुद्धा म्हणत विनायकराव भेटीला येतात आणि मार्गदर्शन करतात अशी आठवणही देवेंद्र फडणवीसां(Devendra Fadnavis) यावेळी सांगितली.

Devendra Fadnavis News
Radhakrishana Vikhe Patil On Gokul : ''...तर 'गोकुळ'वर कारवाई केली जाईल!''; मंत्री विखेंचा सूचक इशारा

...यासाठी शासन निधी देईल!

दरम्यान, येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाच्या आवारात दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांचा पुतळा उभारावा या मागणीचे निवेदन समितीने देवेंद्र फडणवीस यांना दिले. आपल्या भाषणात त्यांनी या आयटीआयला दिवंगत मेटे यांचे नाव देऊन आवारात पुतळा उभारला जाईल. यासाठी शासन निधी देईल अशी घोषणा फडणवीसांनी केली.

त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसंग्रामला पुढे न्यायचंय...

आपल्या भाषणात फडणवीस यांनी दिवंगत मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांचे कौतुक केले. घटनेनंतर आपण लागलीच गेलो तेव्हा त्यांच्याकडे पाहून बोलण्याची हिंमत झाली नाही. मात्र, त्या कठीण प्रसंगातून बाहेर पडल्या व जबाबदारी अंगावर घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसंग्राम परिवार पुढे न्यायचा आहे. आपण कायम पाठीशी असू असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com