MLA Rajesh Tope News : मराठवाड्यातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी विदर्भ, कोकण, कृष्णा खोऱ्यातून पाणी वळवावे लागेल...

Marathwada News : मराठवाड्याने ३५ वर्षे दुष्काळ पाहिला असून, यामध्ये २१ वर्षे अति तीव्र दुष्काळाला आपल्याला सामोरे जावे लागले आहे.
MLA Rajesh Tope News
MLA Rajesh Tope News Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada Water Issue News : हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्याला कायम संघर्षच करावा लागतो, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. (Marathwada Drought News) परंतु मराठवाड्यातील पाण्याची तूट कायमस्वरूपी भरून काढायची असले तर विदर्भ, कोकण आणि कृष्णा खोऱ्यातील पाणी वळवावे लागेल, त्यासाठी पर्यायच नाही, असे स्पष्ट मत माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

MLA Rajesh Tope News
Jayakwadi Water Issue : विवेक कोल्हे संतापले, ‘हे दुर्दैवी...पाणी पिण्यासाठी नव्हे; तर...’

नगर-नाशिकच्या धरणातून जायकवाडी धरणात 8.6 टीएमसी पाण्यासाठी मराठवाड्याला रस्त्यावर उतरावे लागले. संघर्ष, लढ्यातून आता कुठे पाणी सोडण्यात आले. या लढ्याच्या अग्रस्थानी राहिलेले आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी मराठवाड्यातील दुष्काळावर भाष्य करताना विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला.

`मराठवाड्याचा पाणीप्रश्न` या विषयावर टोपे यांनी विशेष व्याख्यान दिले. केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणानुसार मराठवाड्यातील (Marathwada) आठही जिल्हे गरीब जिल्हे म्हणून नोंद करण्यात आली आहे. (Water Relase) मराठवाड्यात कमी पाऊस पडतो, याबरोबरच हा भाग दुष्काळी भाग आहे, हा भाग पर्जन्यछायेत येतो, हा भाग आत्महत्याग्रस्त आहे, हा गरीब जिल्ह्यांचा भाग आहे. या भागात आज दररोज तीन आत्महत्या होत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2020- 773, 2021-887 तर 2022 मध्ये १०२२ आणि आता या वर्षातील अकरा महिन्यांत 877 आत्महत्या या भागात झालेल्या आहेत. ही सगळी स्थिती पाहता काही उपाययोजना तत्काळ करणे आवश्यक आहे. दुष्काळजन्य स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने पाण्याच्या स्राेताचा आजपासून शोध घेत त्या अनुषंगाने पावले उचलणे गरजेचे आहे.

आत्ताच पावसाळा संपला असला तरी 125 पेक्षा अधिक टँकर सुरू असून, 350 पेक्षा अधिक विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, मग उन्हाळ्यात काय परिस्थिती होईल, याचा विचार न केलेलाच बरा. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांमध्ये मराठवाड्याने ३५ वर्षे दुष्काळ पाहिला असून, यामध्ये २१ वर्षे अति तीव्र दुष्काळाला आपल्याला सामोरे जावे लागले आहे. जल साक्षरतेवर सर्व पातळ्यांवर काम होणे आवश्यक असून, मराठवाड्यातील सर्वसामान्य नागरिकांनी जल साक्षर होणे काळाची गरज असल्याचे टोपे म्हणाले.

पाणीटंचाई नियोजन, परीक्षा शुल्क माफी, शेतसारा माफ करणे, चाऱ्याचा प्रश्न, पिण्याचे पाणी, विजेचे कनेक्शन बंद न करणे, हाताला काम, पिकांमध्ये परिवर्तन करणे, अनुदान वाटप, विमा वाटप अशा सर्वच बाबींचे नियोजन करणे नितांत गरजेचे असून, शासनाने या सर्व बाबींकडे गंभीरपणे लक्ष देऊन कार्यवाही केली पाहिजे. महाराष्ट्रात असलेल्या गोदावरी, कृष्णा, तापी व कोकण खोरे यापैकी मराठवाड्याचा अधिक भाग गोदावरी खोऱ्यावर अवलंबून आहे.

आज मराठवाड्यात 20 % सिंचन क्षेत्र असून, येत्या काळात सर्व प्रकल्प पूर्ण झाले तरी 2040 मध्ये आपण 25 % पर्यंत पोहाेचणार आहोत. तरी मराठवाड्याचा भाग राज्याच्या आणि इतर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत तुटीत राहणार आहे. यामुळे ही तूट भरून काढण्यासाठी आपल्याला तीन भागांतून पाणी मराठवाड्यात आणणे आवश्यक आहे. कोकण, विदर्भ आणि कृष्णा खोरे या भागातून आपल्याला पाणी मराठवाड्यात वळवावे लागेल.

MLA Rajesh Tope News
MLA Rajesh Tope News : बेदरेने तो फोटो अंतरवालीत शरद पवारांच्या दौऱ्यात घुसून काढला असावा..

विशेषत: या पाण्याबाबत शासन निर्णय झाला असून, याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. ही अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी मिळून राजकारणविरहित एकत्र येत काम करणे आवश्यक असून, यासाठी वैध मार्गाने लढे उभा करावे लागतील. १६८ टीएमसी हे आपल्या हक्काचे पाणी मिळणे हा आपला अधिकार आहे.

सध्या सर्वांनी आपापल्या भागात पाणीवापर सहकारी संस्थांची निर्मिती करीत आपल्या पाण्याची मागणी करणे नितांत गरजेचे आहे. या माध्यमातून 65% ची झालेली बेंचमार्क बदलून ती 100% करणे शक्य होणार असून, आपल्याला आपल्या हक्काचे पाणी मिळण्याचा मार्ग सुखकर होईल, असा विश्वासही टोपे यांनी व्यक्त केला.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com