Maratha Reservation News : `मोदी गो बॅक`, सकल मराठा समाजाचा शिर्डीतील सभेवर बहिष्कार...

Marathwada Political News : मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यावरही मराठा समाजाने बहिष्कार टाकला होता.
Maratha Reservation News
Maratha Reservation News Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषण आंदोलन सुरू केले. (Maratha Reservation News) मराठा आरक्षणाचा अद्यादेश काढण्यासाठी सरकारला दिलेली डेडलाइन संपल्यानंतर कायद्याच्या पदावर असलेल्या म्हणजेच खासदार, आमदार, मंत्र्यांना गावात बंदीची घोषणाही जरांगे यांनी केली होती.

Maratha Reservation News
Maratha Reservation News : मराठा तरुण बलिदान देत असताना वाढदिवस साजरा करणे मला पटत नाही...

याचे लोण राज्यभरात पोहाेचत असून, बहुतांश गावांनी राजकीय नेत्यांना गावबंदीचे फलक वेशीवरच लावले आहेत. (Marathwada) अंतरवालीतील आंदोलन पेटले असतानाच सकल मराठा समाजानेही आक्रमक भूमिका घेत राजकीय नेत्यांच्या सभा, मेळाव्यावर बहिष्काराची घोषणा केली आहे. (Maratha Reservation) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुका सकल मराठा समाजाने यासंदर्भात नुकतेच एक बॅनर सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभरात व्हायरल केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या शिर्डी येथील दौरा आणि जाहीर सभेवर बहिष्कार टाकण्याची घोषणा या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आली आहे. ` मोदी गो बॅक` जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणताच नेता आमचा नाही, असा इशारा यात देण्यात आला आहे. या संदर्भात सिल्लोड तालुका सकल मराठा मुख्य समन्वयक डाॅ. नीलेश मिरकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मोदीच्या सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याच्या बॅनरला दुजोरा दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमच्या समन्वय समितीने या संदर्भात बैठक घेऊन निर्णय घेतला होता. त्यानुसारच हे बॅनर लावण्यात आले आहे. राज्यभरात हा संदेश पोहाेचवणे आमचा यामागचा हेतू आहे. मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यावरही मराठा समाजाने बहिष्कार टाकला होता. सिल्लोड तालुक्यातून फक्त एक टक्का मराठा समाज सभेसाठी गेला होता, असा दावाही मिरकर यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले. राजकीय नेत्यांना गाव, तालुका, जिल्हा आणि राज्यबंदीचे आवाहन केले असून, आम्ही मराठा समाज बांधव शपथ घेतो की, जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही राजकीय सभा, मेळाव्यांना जाणार नाही.

कोणत्याही राजकीय नेत्यासोबत फिरणार नाही, जो कोणी जात बाजूला सारून पक्ष व नेता मोठा समजत असतील त्यांचाही बहिष्कार, अशी आक्रमक भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आहे. एकही मराठा समाज बांधव मोदींच्या शिर्डी येथील सभेला जाणार नाही. मराठा शांत आहे म्हणून यांचे दौरे चालू झाले, मराठा आरक्षण मिळेपर्यंत एकही नेता घराबाहेर पडता कामा नये, असे आवाहनही सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com