Tuljabhavani Mandir News : अबब! तुळजाभवानी मंदिर लेखाधिकाऱ्याला सहा लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले...

Tuljabhavani Mandir : एकूण तीन कोटी 88 लाख रूपयांचे हे एकूण काम होते...
Tuljabhavani Tempel News
Tuljabhavani Tempel NewsSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले तुळजाभवानी देवी मंदिर संस्थान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मागील वर्षापासून तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचा गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा नोंद असून, त्याची चौकशी सुरू आहे. त्यातच आज मंदिर संस्थानचे लेखाधिकारी शिंदे यांनी सहा लाख रुपयांची लाच घेतल्याने घटनेने एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Tuljabhavani Tempel News
‘…तर शरद पवार खुर्च्या मांडून बसले असते’, निकालावर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया | NCP |

कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिर संस्थानचे मुख्य लेखाधिकारी सिध्देश्वर मधुकर शिंदे यास सहा लाख रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. एका शासकीय ठेकेदाराकडून केलेल्या कामाचे देयक अदा करण्यासाठी शिंदे याने 10 लाख रूपयांची मागणी केली होती. पंचासमक्ष सहा लाख रूपये रोख स्वीकारताना तुळजाभवानी मंदिराच्या प्रशासकीय कार्यालयातून त्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून अटक केली आहे.

तुळजाभवानी मंदिराच्यावतीने तुळजापूर शहरात तुळजाभवानी सैनिकी विद्यालय चालविले जाते. या विद्यालयाच्या संरक्षण भिंतीसह प्रवेशद्वाराच्या बांधकामाचा ठेका सोलापूर येथील एका शासकीय कंत्राटदाराला मिळाला होता. तीन कोटी 88 लाख रूपयांचे हे एकूण काम होते. 90 टक्के बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे दोन कोटी रूपयांपेक्षा अधिकच्या देयकाची रक्कम तपासणी करून मंजुरीस पाठविण्यासाठी, जमा करण्यात आलेली अतिरिक्त सुरक्षा रक्कम 34 लाख 60 हजार रूपये परत मिळवून देण्यासाठी 10 लाख रूपये लाचेची मागणी केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोन-तीन दिवसांपासून त्यासाठी तडजोड सुरू होती. तडजोडीअंती हा व्यवहार सहा लाख रूपयांमध्ये मान्य करण्यात आला. तडजोडीत ठरल्याप्रमाणे बुधवार, 7 फेब्रुवारी रोजी दुपारी तुळजाभवानी मंदिराच्या प्रशासकीय कार्यालयात सहा लाख रूपये स्वीकारताना लेखाधिकारी शिंदे यास अटक करण्यात आली आहे. तुळजापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सिध्दराम म्हेत्रे, पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे, आशिष पाटील यांनी केली.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com