Tuljapur News : तुळजापुरात निवडणुकीपूर्वीच काँग्रेस -भाजपमध्ये 'राडा'; दोन बड्या नेत्यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी

Tuljapur election news 2025 : तुळजापुरात निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये हिंसाचार; दोन बड्या नेत्यांच्या समर्थकांचा थरारक भिडा. संपूर्ण बातमी वाचा.
Tuljapur News : तुळजापुरात  निवडणुकीपूर्वीच काँग्रेस -भाजपमध्ये 'राडा'; दोन बड्या नेत्यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी
Published on
Updated on

BJP Congress clash news : तुळजापूरमध्ये काँग्रेस आणि भाजपमधील संघर्ष काल उफाळून आला. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनोद गंगणे व काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अमर मगर यांचे भाऊ ऋषी मगर यांच्या गटात राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरून जोरदार हाणामारी झाली. यामध्ये कोयते, पिस्तूलचाही वापर करण्यात आल्याचे समजते. या हाणामारीत मगर यांचे चुलत बंधू कुलदीप मगर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापुरातल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील आणि त्यांचा एक नातेवाईकही या हल्ल्यात किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. तुळजापूर -नळदुर्ग राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर मगर यांचा एक नातेवाईक कंत्राटदार आहे. तो करत असलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आक्षेप घेत गंगणे समर्थकांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन तेथील कर्मचाऱ्याला जाब विचारत धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे.

Tuljapur News : तुळजापुरात  निवडणुकीपूर्वीच काँग्रेस -भाजपमध्ये 'राडा'; दोन बड्या नेत्यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी
NCP: मोठी बातमी: आधी सुप्रिया सुळेंचा फोन, मग शिलेदार पोहोचला भेटीला : अजितदादांना मिळाला दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीचा प्रस्ताव

स्वतः विनोद गंगणे तिथे असल्याने त्यांनी वाद घातल्याचे कळाल्यानंतर अमर मगर यांचे बंधू ऋषिकेश मगरही घटनास्थळी दाखल झाले. दोघांचे समर्थक मोठ्या संख्येने जमल्यामुळे तिथे आधी शाब्दिक चकमक उडाली. वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात होऊ नये यासाठी काही जणांनी मध्यस्थी केली आणि हा वाद मिटवला.

परंतु या वादाची माहिती तुळजापुरात पसरल्याने गंगणे यांचे आणखी काही समर्थक मगर यांच्या घराजवळ आले आणि कोयता, काठीने एकमेकांवर दोघांच्या समर्थकांनी हल्ला चढवला. यात कुलदीप मगर यांच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा झाल्या. पोलिसांनी याप्रकरणी सागर गंगणे व साठे नावाच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तेव्हा तिथे पिस्तुलाचे दोन राऊंड झाडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. एका बुलेटच्या मागचा भाग घटनास्थळी आढळला असून पण कोणालाही इजा झाल्याची माहिती नाही. त्यामुळे हवेत फायरी झाडण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. दरम्यान या प्रकारामुळे शहरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी मोठा फौज फाटा तैनात केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Tuljapur News : तुळजापुरात  निवडणुकीपूर्वीच काँग्रेस -भाजपमध्ये 'राडा'; दोन बड्या नेत्यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी
Sanjay Raut : संजय राऊतांची तोफ पुन्हा धडाडली! "शिंदे गट म्हणजे..."; 'त्या' एका विधानाने राजकीय वातावरण तापलं!

राजकीय वादातून संघर्ष

तुळजापूर नगरपालिका निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद गंगणे व काँग्रेसचे अमर मगर यांच्यात काटे की टक्कर झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. दरम्यान प्रचारात दोघांनीही एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर टीका केली होती. त्यामुळे त्यांच्यात खुन्नस होतीच, त्याचे पडसाद या राड्याच्या रूपात उमटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com