Education Officer Suspended : परभणीत दोन शिक्षणाधिकारी निलंबित..

Marathwada : दोघांनाही पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात नमूद केले आहे.
Education Officer Suspended
Education Officer SuspendedSarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : शिक्षणाधिकारी आशा गरुड आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. (Education Officer Suspended) दोघांनी शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असताना खोट्या दस्तऐवजांच्या आधारे परभणी जिल्ह्यातील अनेक खाजगी शिक्षण संस्थांमध्ये कार्यरत असलेले मुख्याध्यापक, सहशिक्षक, कला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनियमितपणे वैयक्तिक मान्यता प्रदान केली होती.

Education Officer Suspended
Mla Ramesh Bornare News : आमदाराने तक्रार करताच आरटीओचे पथक पहाटे चार वाजता कामाला..

शासनावर आर्थिक दायित्व निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. (Parbhani) त्यांच्याविरोधातील तक्रारीत तथ्य आढळून आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. (Education) महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र शासनाचे उप सचिव टि.पा. करपते यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत.

दोघांनाही पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात नमूद केले आहे. दरम्यान शिक्षणाधिकारी आशा गरुड व विठ्ठल भूसारे यांचा कार्यकाळ चांगलाच वादग्रस्त राहिला. (Marathwada) शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर त्यांच्या विरुध्द मोठा जनक्षोभ उसळला होता. अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी त्यांच्या निलंबनाची मागणी करत आंदोलने केली होती.

शिक्षण विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. शिक्षण क्षेत्रातील अपहार समोर आल्याने शिक्षण खात्याची बदनामी होत होती. अखेर शालेय शिक्षण विभागाने या तक्रारींची दखल घेत दोन्ही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. या कारवाईमुळे जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. खोट्या व बनावट दस्ताएवेजाआधारे नियुक्ती मिळवून कार्यरत असलेल्या कर्मचान्यांवर कारवाई होणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com