दानवेंसह भाजप कार्यकर्त्यांनी फस्त केले दोनशे वडापाव ; पण बील द्यायलाच विसरले..

भुकेची वेळ असल्याने सगळ्यांनी तब्बल दोनशे वडापाव आणि काही प्लेट भज्यांवर ताव मारला. (Raosaheb Danve)
Railway Minister Ashiwini Vaishnav, Raosaheb Danve and Other
Railway Minister Ashiwini Vaishnav, Raosaheb Danve and OtherSarkarnama

औरंगाबाद : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहबे दानवे अन् वाद, किस्से हे जनु आता समीकरणंच बनले आहे. (Raosaheb Danve) अस्सल ग्रामीण ढंगात भाषणाची त्यांची शैली, हाऊमच हा जगप्रसिद्ध डायलाॅग आणि बरचं काही. (Bjp) त्यामुळे दानवे असतील तिथे हमखास काहीतरी घडतंच. (Mumbai) ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील गजनान वडापाव सेंटरमध्ये असाच प्रकार घडला आणि त्यांची राज्यभरात चर्चा सुरू झाली. (Maharashtra)

त्याचे झाले असे की, मध्य रेल्वे विभागाच्या वतीने ठाणे-दिवा लोकल मार्गाच्या सहाव्या मार्गाचे लोकार्पण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आॅनलाईन पार पडले.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपचे अनेक खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने हजर होते. उद्धाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतर हे सगळे रेल्वेस्थानकाबाहेरच्या गजानन वडापाव सेंटरमध्ये नाश्ता करण्यासाठी गेले.

भुकेची वेळ असल्याने सगळ्यांनी तब्बल दोनशे वडापाव आणि काही प्लेट भज्यांवर ताव मारला. आता केंद्रीय मंत्री, आमदार, खासदार असा लवाजमा, त्यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारी असल्याने मोठी गर्दी होती. त्यामुळे नाश्ता झाल्यानंतर सगळा लोंढा हाॅटेलच्या बाहेर पडला, तसे सगळेच निघून गेले. यात हाॅटेलवाल्याला नाश्त्याचे पैसे कुणीच दिली नाही.

Railway Minister Ashiwini Vaishnav, Raosaheb Danve and Other
महिलांना घरात घुसून धमकावल्या प्रकरणी तहसिलदार खाडे यांच्यासह इतरांवर गुन्हा

त्यामुळे हाॅटेलमधील एका नोकराने याचा व्हिडिओ केला आणि तो सोशल मिडियावर व्हायरल केला. तशी राज्यभरात या फुकटात खाल्लेल्या वडापाव, भज्याची चर्चा सुरू झाली. समाज माध्यम आणि प्रसार माध्यमांमध्ये देखील याची चर्चा सुरू झाली आणि याची कुणकुण या वडापाव पार्टीच्या एका लाभार्थ्यांला लागली.

प्रकरण अधिक वाढू नये याची खबरदारी घेत मग त्या पदाधिकाऱ्याने हाॅटेल गाठत सगळे बील चुकते केले आणि याची वाच्यता करू नका, अशी विनंतीही केली. खाल्लेल्या वडापावचे बील चुकते केले असले तरी याची चर्चा काही केल्या थांबतांना दिसत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com